सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. यामधीलच एक महत्वाची योजना म्हणजे पीक विमा योजना (Crop Insurance Scheme). पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते.
ऑगस्ट (august) महिन्यात बऱ्याच भागात पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. शेतकऱ्यांचे यावर्षी प्रचंड नुकसान झाले आहे. तर काही पिके कामातून गेली असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली. आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून सरकारने (government) मोठा निधी जाहीर केला आहे.
राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. ही आर्थिक (Financial) मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे सांगण्यात आले होते. आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात (bank accounts farmers) जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
शेतकऱ्यांनो पपई लागवडीसाठी ऑक्टोबर महिना सर्वोत्तम; कमवू शकता लाखों रुपयांमध्ये उत्पन्न
शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वाटप
ऑगस्ट महिन्यात उत्तर सोलापूर मार्डी व सोलापूर मंडळात शेती पिकांचे (agriculture crops) खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 3 कोटी 53 लाख 53 हजार 53 रुपये इतकी मदत वाटप करण्यात आली आहे.
LIC ने लॉन्च केली सर्वोत्तम पॉलिसी; वयाच्या 40 व्या वर्षी मिळणार 50 हजार रुपये पेन्शन
या लोकांना मिळणार मदत
उत्तर सोलापुरमधील कसबे सोलापूर, केगाव, कोंडी, शिवाजी नगर, भोगाव, अकोलेकाटी, कारंबा, गुळवंची, तरटगांव, नरोटेवाडी, बाणेगाव, मार्डी, राळेरास, सेवालाल नगर, होनसळ या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
या गावांतील जवळपास 2978 शेतकऱ्यांचे 2112 हेक्टर क्षेत्रावरील अतिवृष्टी नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर (bank accounts farmers) 3 कोटी 53 लाख 53 हजार 98 रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून आज 15 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
मिथुन, मीन, कन्या राशीच्या लोकांना मिळणार चांगली संधी; नशिबाचीही साथ लाभणार
महत्वाची बातमी! IFFCO ने डीएपी आणि युरियाच्या नवीन किमती केल्या जाहीर
Share your comments