1. यांत्रिकीकरण

इंटरनेट,डेटा नसतानाही वापरा व्हाट्सअप फक्त करा ही सोपी प्रक्रिया

व्हाट्सअप हे ॲप संपूर्ण जगातील च सगळ्यात लोकप्रिय अश्या चॅटिंग अॅप्सपैकी एक ठरलं आहे

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
इंटरनेट,डेटा नसतानाही वापरा व्हाट्सअप फक्त करा ही सोपी प्रक्रिया

इंटरनेट,डेटा नसतानाही वापरा व्हाट्सअप फक्त करा ही सोपी प्रक्रिया

व्हाट्सअप हे ॲप संपूर्ण जगातील च सगळ्यात लोकप्रिय अश्या चॅटिंग अॅप्सपैकी एक ठरलं आहे, WhatsApp या ॲप द्वारे गेल्या काही महिन्यांत च अनेक काही नवीन फीचर्स जारी केले गेल्याचे आपण बघितले आहेत. ज्याचे त्या ॲप च्या सर्व वापरकर्त्यांनी चांगले स्वागत केले. WhatsApp ने अलीकडेच एक नवीन वैशिष्ट्य जारी केले आहे जे तुम्हाला तुमच्या दुय्यम डिव्हाइसवर म्हणजे तुमच्या लॅपटॉप, संगणकावर तुमच्या फोनवर इंटरनेट नसले तरीही व्हाट्सअप चालवण्याची परवानगी देते. आम्ही तुम्हाला या नवीन वैशिष्ट्याबद्दल तपशीलवार माहिती पुढे देत आहोत.

व्हॉट्सअॅपने अलीकडेच त्याच्या बीटा आवृत्तीवर मल्टी-डिव्हाइस सपोर्टचे एक नवीन वैशिष्ट्य जारी केले आहे, ज्यामुळे Android आणि iOS वापरणारे त्यांच्या लॅपटॉपवर हे WhatsApp नक्कीच सहज रित्यावापरू शकतात.

हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना एकाच वेळी एकूण चार डिव्हाइसवर WhatsApp उघडण्याची आणि चॅट करण्याची परवानगी देते आणि तुमच्या स्मार्टफोनवर इंटरनेट कनेक्टिव्हिटीची आवश्यकता नाही.

या वैशिष्ट्याचे फायदे :- प्रदीर्घ चाचणीनंतर जुलैमध्ये हे वैशिष्ट्य जारी करण्यात आले. या वैशिष्ट्यासह, तुम्ही तुमचा लॅपटॉप नाहीतर डेस्कटॉप, किंवा मॅक किंवा फेसबुक पोर्टल वापरू शकता आणि संदेश प्राप्त करण्यासाठी आणि पाठवण्यासाठी प्लॅटफॉर्म किंवा डिव्हाइसवर लॉग इन करू शकता. दुय्यम उपकरण यावर देखील, WhatsApp ने त्याचे एंड-टू-एंड एनक्रिप्शन हे लागू करण्यात आले आहे, ज्यामुळे WhatsApp किंवा अन्य कोणताही तृतीय पक्ष हा तुमचे संदेश ॲक्सेस करू शकत नाही.

जवळजवळ कोणत्याही स्मार्टफोनची आवश्यकता नाही. त्याच बरोबर हे वैशिष्ट्य वापरण्या आधी, तुमचा फोन हा तुमच्या इतर गॅजेट्स च्या जवळ असायला हवा आहे आणि त्यात इंटरनेट कनेक्शन असणे हे पण आवश्यक आहे. परंतु आता नुकतेच जे अपडेट प्रसिद्ध झाले त्याअपडेटनंतर, तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट नसतानाही इतर उपकरणांवर WhatsApp वापरणे कार्य करेल.

याचा फायदा असा की, व्हॉट्सअॅप दुसऱ्या डिव्हाइसवर वापरताना, तुम्हाला तुमचा फोन तुमच्यासोबत ठेवावा लागणार नाही आणि तुमच्या फोनमध्ये बॅटरी नसली आणि फोन डिस्चार्ज झाला तरीही व्हॉट्सअॅप इतर डिव्हाइसवर चालेल.

हे वैशिष्ट्य कसे वापराल :- तुमचे असलेले WhatsApp चे खाते हे दुसर्‍या कोणत्या डिव्‍हाइस सोबत लिंक करण्‍यासाठी, तुम्‍हाला आधी, WhatsApp he त्याच्या नवीनतम असलेल्या आवृत्तीवर अपडेट करावे लागणार आहे. त्यानंतर तुमच्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप ओपन केल्या नंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीन वरील उजव्या बाजूस तीन डॉट दिसतील. त्या वर क्लिक केल्या च्या नंतर लगेच एक ड्रॉप-डाउन मेनू ओपन होईल.

त्यानंतर तिसऱ्या पर्यायात तुम्हाला एक ‘लिंक डिव्हाइस’ असा पर्याय दिसेल, सगळ्यात आधी तुम्हाला यावर क्लिक करायचे आहे आणि मग ‘लिंक डिव्हाइस’ हा एक ऑप्शन दिसेल, आणि त्यांनतर तुम्हाला ‘मल्टी-डिव्हाइस बीटा’ हा पर्याय निवडल्यानंतर ‘जॉइन बीटा’ हा पर्याय दिसणार आहे. तसेच तुम्ही जेव्हा इच्छिता तेव्हा हा पर्याय बंद करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या फोन द्वारे तुमचे डिव्हाइस हे पुन्हा स्कॅन करावे लागणार आहे.

English Summary: Use WhatsApp without internet, data, just do this simple process Published on: 09 April 2022, 09:15 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters