शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर शेतीमध्ये आधुनिक कृषी यंत्रांचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे पिकांचा दर्जा आणि उत्पादन दोन्ही चांगले राहते तसेच उत्पादनात देखील वाढ होते.
आजकाल अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेली नवीन कृषी यंत्र वापरत आहेत त्यामुळे त्यांना चांगला नफा मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर या लेखात आपण अशाच एका कृषी यंत्राविषयी माहिती घेणार आहोत ज्याचा वापर कमी श्रमात आणि कमी खर्चात चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतीमध्ये करता येणे शक्य आहे.
ट्रॉली पंप शेतकऱ्यांसाठी फायदेशीर यंत्र
या कृषी यंत्राचे नाव ट्रॉली पंप असून शेतीमध्ये खूप उपयुक्त मानले जाणारे हे यंत्र आहे. जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे कृषी यंत्र अतिशय उपयुक्त आहे
. या ट्रॉली पंपाच्या साहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करता येते त्यामुळे श्रम आणि वेळ दोन्ही वाचतात शिवाय पिकाची गुणवत्ता व उत्पादन वाढते.
ट्रॉली पंपाची किंमत
पेट्रोल पंप महाग आहे परंतु ते इतके उपयुक्त आहे की त्याची किमतीच्या मानाने त्याचा उपयोग फारच जास्त आहे. बाजारामध्ये आपण पाहिले तर अनेक प्रकारचे ट्रॉली पंप उपलब्ध आहेत. हा पोर्टेबल आणि ट्रॉली प्रकारचा स्प्रे पंप असून त्याची किंमत सुमारे 40 ते 45 हजार आहे.
ट्रॉली पंपाचे मॉडेल
1-Sparman-PT 200 या मॉडेलची किंमत सुमारे 40 ते 45 हजार रुपये आहे.
2-LTRable स्प्रेडर- यामध्ये होंडा GX80 इंजिन असून त्याची किंमत पंचेचाळीस हजार रुपये पर्यंत आहे.
3- याशिवाय स्परमन पिटी 200M ट्रॉली पंप हा दोनशे लिटर पोटेन्शिअल स्प्रेयर विथ मॅरेथॉन GEC मोटर प्रकाराचा असून याची किंमत 35 हजारापर्यंत आहे.
नक्की वाचा:वापरा कोनो वीडर अन पिक ठेवा तणमुक्त, वाचेल खर्च आणि वेळ
Share your comments