आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याच डोंगराळ भागाच्या परिसरात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु डोंगराळ भागांमध्ये किंवा उंच सखल भागात शेती करणे हवे तितके सोपे नाही. विशेष म्हणजे उंच सखल भागात शेती करणे खूप जिकिरीचे काम असून यामुळे जमीन सुधारणा चांगल्या पद्धतीने करता येत नाही. परंतु काही कृषी यंत्र यामध्ये खूप शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरतात. या यंत्राच्या पण या लेखात माहिती घेऊ जी डोंगराळ भागांमध्ये देखील शेती करण्यास उपयुक्त ठरतात.
नक्की वाचा:Agri Machinary: पिकांना सारख्या प्रमाणात खते द्यायचे असतील तर वापरा 'हे' यंत्र,होईल फायदा
उंच सखल भागात उपयुक्त ठरणारी शेती यंत्र
1-प्राणीचलित प्रगत रिबन- या उपकरणाचा वापर करून तन्य शक्ती कमी करण्यासाठी पारंपारिक सरड ब्लेडच्या जागी सुधारित व्ही ब्लेड वापरले जाते.
हे ब्लेड माती चांगल्या पद्धतीने मोकळी करते व त्याच्या मागे ठेवलेला रोल मातीचे जे काही ढेकुळ उठतात ते फोडण्यास मदत करते व त्यामुळे माती व्यवस्थित भुसभुशीत होते व जमीन सपाट होते. यामुळे मातीची आद्र्रता टिकून राहते. या यंत्राची किंमत अंदाजे चार हजार रुपयांपर्यंत आहे.
2- पावर टिलर चलित खुरपणी यंत्र- हे यंत्र आठ ते दहा एचपी आकाराच्या पावर टिलरसाठी खास पद्धतीने डिझाईन केले आहे. या यंत्राच्या सहाय्याने विस्तीर्ण क्षेत्र वरील पिकांच्या तणाचा आणि देठांचा नायनाट करता येतो.
यामध्ये स्वीप प्रकारचा ब्लेड, मुख्य फ्रेम तसेच हँडल, स्टिअरिंग व्हील पूल सिस्टीम समाविष्ट आहे. या मशिनची किंमत अंदाजे आठ हजार रुपये आहे.
नक्की वाचा:Machinary: 'ट्रॅक्टरचलित फुले बहुपीक टोकण यंत्रा'चे फायदे आणि शेतकऱ्यांना होणारा फायदा
3-स्ट्रा रिपर- शेतामधील भुईमुगाच्या शेंगा तसेच बटाटे काढण्याकरता या यंत्राचा वापर करता येतो. यामध्ये सीड्स फ्रेम, हँडल, स्टिअरिंग व्हील, डेप्थ ऍडजेस्टमेंट सिस्टम आणि व्ही ब्लेड यांचा समावेश होतो. या यंत्राच्या सहाय्याने आपण मातीतून भाजीपाला सहज काढू शकतो त्यामुळे कष्ट आणि श्रम देखील वाचतात.
4- पावर टिलर- एक महत्त्वपूर्ण यंत्र असून याच्या साह्याने शेती सोप्या पद्धतीने करता येते व हे डोंगराळ भागातील शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त यंत्र आहे. लहान असल्यामुळे ते उंच-सखल शेतामध्ये देखील अगदी सहजपणे ने-आण करता येते. याचा वापर पेरणीसाठी केला जातो.
नक्की वाचा:भावांनो! नेमके काय आहे 'सीड ड्रिल मशीन'? वाचा त्याची किंमत आणि उपयोग
Share your comments