1. यांत्रिकीकरण

Agri Machinary: पिकांना सारख्या प्रमाणात खते द्यायचे असतील तर वापरा 'हे' यंत्र,होईल फायदा

शेतकरी बंधू पिकांना भरघोस वाढीसाठी वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक खते देतात. शेतकरी खते देताना हाताने देतात. परंतु यामध्ये आपण कधी विचार करतो का जेव्हा आपण हाताने खत देतो तेव्हा ते पिकाला एक सारख्या प्रमाणात दिले जाते का नाही. त्यामुळे बरेच खतांचा अपव्यय होतो. या समस्येवर उपाय म्हणून ट्रॅक्टरच्या सहाय्याने चालणारे 'फर्टीलायझर ब्रॉडकास्टर' यंत्र पिकांना एकसमान पद्धतीने व एका प्रमाणात खते देण्यासाठी फायद्याचे ठरते. या लेखात आपण या यंत्र विषयी माहिती घेऊ.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
fertilizer broadcaster

fertilizer broadcaster

शेतकरी बंधू पिकांना भरघोस वाढीसाठी वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक खते देतात. शेतकरी खते देताना हाताने देतात. परंतु यामध्ये आपण कधी विचार करतो का जेव्हा आपण हाताने खत देतो तेव्हा ते पिकाला एक सारख्या प्रमाणात दिले जाते का नाही. त्यामुळे बरेच खतांचा अपव्यय होतो. या समस्येवर उपाय म्हणून ट्रॅक्टरच्या सहाय्याने चालणारे 'फर्टीलायझर ब्रॉडकास्टर' यंत्र पिकांना एकसमान पद्धतीने व एका प्रमाणात खते देण्यासाठी फायद्याचे ठरते. या लेखात आपण या यंत्र विषयी माहिती घेऊ.

नक्की वाचा:मक्याचे 4 नवीन संकरीत वाण लॉन्च; शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर

 'फर्टीलायझर ब्रॉडकास्टर'यंत्राची रचना

 जर आपण या यंत्राच्या रचनेचा विचार केला तर यामध्ये एक फ्रेम म्हणजेच सांगाडा हा एक मुख्य घटक असून यावर या यंत्राचे इतर घटक जोडलेले आहेत. या फ्रेमची जी पुढची बाजू असते ती ट्रॅक्टरच्या तीन पॉइंट लिंकेज प्रणालीला जोडले जाते.

याला एका धातूच्या शीट पासून शंकूच्या आकाराचे एक नरसाळे बसवलेले असते. या नरसाळ्यात आपल्याला जे खत द्यायचे आहेत ते टाकले जाते. या नरसाळ्याला दोन नळ्या असतात  व या सगळ्यांना 'रेगुलेटिंग लिव्हर' च्या माध्यमातून नियंत्रित केले जाते.

याचा फायदा असा होतो की जेव्हा आपण  खते सोडतो तेव्हा ते आपल्या आवश्यकतेनुसार सोडले जाते. या यंत्रामध्ये जो खतांचा वितरण भाग असतो तो नरसाळ्याच्या खालच्या बाजूला असतो. या वितरण भागांमध्ये खतांचे जे काही खडे असतात ते फोडून खत पुढे पाठवण्यासाठी डीस्क, व्हेन आणि एजीटेटर सारखे घटक आहेत.

नक्की वाचा:Soil Management: शेतात गाळ टाकतांना कोणती काळजी घ्यावी? कोणता गाळ टाकू नये? फायदे, वाचा सविस्तर

नरसाळ्याच्या खाली एक स्प्रेडींग तबकडी असते. या माध्यमातून या युनिटवर गुरुत्वाकर्षणामुळे दोन ओपनिंग द्वारे खत पडते. त्यासोबतच वितरक स्प्रेडर सिस्टममध्ये एक डिस्क असते. ती डिस्क उभ्या अक्षाभोवती फिरते.

या डिस्कमध्ये चार व्हेन असतात. या डिस्कचा रोटेशनमुळे तयार झालेल्या केंद्र प्रसारक बलामुळे खत पसरली जातात. या सगळ्या प्रणालीमुळे पिकांना खत एकसारखे प्रमाणात दिले जाते व गरजेनुसार ते 12 ते 14 मीटर अंतरापर्यंत पसरवता देखील येते.

 या यंत्राचे होणारे फायदे

1- या यंत्राच्या साहाय्याने कमी वेळात मोठ्या क्षेत्रात खत देण्याचे काम शक्य होते.

2- दाणेदार सेंद्रिय घन खतांचे एक समान वितरण करता येते. वेळेची तसेच इंधनाची देखील बचत होते.

3- तसेच शेतकऱ्यांच्या शरीराशी कुठल्याही प्रकारचा खतांचा संपर्क येत नसल्यामुळे एलर्जी व इतर समस्या निर्माण होत नाहीत.

नक्की वाचा:Machinary: 'ट्रॅक्टरचलित फुले बहुपीक टोकण यंत्रा'चे फायदे आणि शेतकऱ्यांना होणारा फायदा

English Summary: fertilizer broadcaster machine is useful for provide fertilizer to crop Published on: 09 September 2022, 03:30 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters