1. यांत्रिकीकरण

Machinary: दगड गोट्यांची अडचण आहे शेती करण्यात, तर 'स्टोन पिकर'येईल तुमच्या मदतीला

सध्या यंत्राचा विचार केला तर प्रत्येक क्षेत्रात यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने वेळ आणि श्रमामध्ये बचत झाली आहे. याला कृषिक्षेत्र देखील अपवाद नाही. अगदी छोट्या-मोठ्या कामासाठी सध्या शेतीमध्ये यंत्रांचा वापर होऊ लागला आहे. शेताची पूर्वमशागत ते पिकांची काढणी इथपर्यंतचे कामे आता यंत्रामार्फत होऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या वेळेत आणि पैशामध्ये बऱ्यापैकी बचत होत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
stone picker machine for remove stone fron land

stone picker machine for remove stone fron land

 सध्या यंत्राचा विचार केला तर प्रत्येक क्षेत्रात यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने वेळ आणि श्रमामध्ये बचत झाली आहे. याला कृषिक्षेत्र देखील अपवाद नाही. अगदी छोट्या-मोठ्या कामासाठी सध्या शेतीमध्ये यंत्रांचा वापर होऊ लागला आहे. शेताची पूर्वमशागत ते पिकांची काढणी इथपर्यंतचे कामे आता यंत्रामार्फत होऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या वेळेत आणि पैशामध्ये बऱ्यापैकी बचत होत आहे.

आपल्याला माहित आहे की, शेती करीत असताना बऱ्याचदा  शेतीमध्ये दगड आणि गोट्यांचे प्रमाण असल्यामुळे मशागत करण्यास खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होतात व हे दगडगोटे वेचून बाहेर काढणे फार जिकिरीचे काम असते. परंतु आता चिंता करण्याची गरज नसून यासाठी स्टोन पिकर  मशीन खूप उपयुक्त ठरत आहे. याविषयी या लेखात माहिती घेऊ.

नक्की वाचा:Technology: पिकांना हवा तेवढाच होतो ऑटोमॅटिक पाण्याचा पुरवठा, 'हे'तंत्रज्ञान आहे फायदेशीर

 स्टोन पिकर मशीन आणि वैशिष्ट्ये

 बरेच शेतकरी थोड्याशा डोंगराळ भागात शेती करतात परंतु अशा ठिकाणी बऱ्याच प्रकारची दगड-गोटे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मशागत करण्यास अडचणी निर्माण होतात व यामुळे बियाण्याची उगवण क्षमता देखील प्रभावित होते.

अशी शेतातील दगडगोटे उचलणारी म्हणजेच स्टोन पिकर मशीन खूप उपयुक्त आहे. या यंत्राच्या साह्याने शेतातील बारीक दगड-गोटे देखील सहजपणे वेचून शेत व्यवस्थित स्वच्छ करता येते. या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे छोटे आणि मोठ्या आकाराचे सगळ्या प्रकारचे दगडगोटे एकाच वेळेस उचलून घेते.

नक्की वाचा:Machinary: 'या' यंत्राच्या साह्याने ऊसातील आंतरमशागत होईल सोपी,वाचेल खर्च आणि वेळ

हे यंत्र कसे काम करते?

 या यंत्राला ऑपरेट करण्यासाठी ट्रॅक्टरची आवश्यकता असून एका एकर क्षेत्रातील दगड गोटे दोन तासात उचलून देण्याची त्याची क्षमता असते.

त्यामुळे शेतीची मशागत करणे सोपे होते व कमी कष्ट लागतात. छोटे-मोठे अशा सगळ्या प्रकारचे दगड गोटे यामुळे उचलता येणे शक्य आहे. शेतीची मशागत व्यवस्थित करता आल्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते. पिकांची गुणवत्ता देखील सुधारते व जमीन चांगली उत्पादनक्षम बनते.

या यंत्राची किंमत

 बाजारामध्ये यंत्र जवळपास चार लाख रुपयांपर्यंत मिळते. यंत्राची मॅन्युफॅक्चरिंग पंजाब राज्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. जर तुम्हाला देखील हे यंत्र खरेदी करायचे असेल तर तुम्ही पंजाब राज्यातील खासगी कंपन्यांची याबाबतीत संपर्क करू शकतात एवढेच नाही तर आपल्याकडील काही खाजगी कंपन्या देखील या बाबतीत तुम्हाला माहिती पुरवू शकतात.

नक्की वाचा:Agri Machinary: उसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत बनवण्यासाठी होतो 'या' यंत्राचा वापर, वाचा सविस्तर

English Summary: stone picker machine is so useful for remove stone from land Published on: 25 September 2022, 10:40 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters