1. यांत्रिकीकरण

सोनालीका ट्रॅक्टर चे भारतातील पहिले 5जी ट्रॅक्टर लॉन्च

भारताची प्रसिद्ध ट्रॅक्टर निर्माता कंपनी सोनालीका ट्रॅक्टर ने भारतातील पहिला फाईव्ह जी ट्रॅक्टर लॉन्च केले आहे. या नवीन लॉन्च केलेल्या फाईव्ह जी ट्रॅक्टर चे नाव आहे महाराजा डी आय-745lll हे आहे. ट्रॅक्टर प्रामुख्याने राजस्थानच्या शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन बनवले गेले आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
sonalika tractor

sonalika tractor

 भारताची प्रसिद्ध ट्रॅक्टर निर्माता कंपनी सोनालीका ट्रॅक्टर ने भारतातील पहिला फाईव्ह जी ट्रॅक्टर लॉन्च केले आहे. या नवीन लॉन्च केलेल्या फाईव्ह जी ट्रॅक्टर चे नाव आहे महाराजा डी आय-745lll हे आहे.  ट्रॅक्टर प्रामुख्याने राजस्थानच्या शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन बनवले गेले आहे.

 राजस्थानातील शेतकऱ्यांच्या स्थानिक आवश्यकता लक्षात घेऊन बनवले गेले आहे.

 सोनालीका महाराजा डीआय -745lll ट्रॅक्टर ची वैशिष्ट्ये

  • सोनालिका चे नवीन ट्रॅक्टर 5 जी महाराजा डी आय -745lll प्रगत तंत्रज्ञानाने संचलित ट्रॅक्टर असून भारतातील पहिले 5 जी टेक्नॉलॉजी लिफ्ट टेक्निक पासून निर्मित केले गेले आहे.
  • हे ट्रॅक्टर प्रामुख्याने राजस्थानच्या शेतकऱ्यांच्या स्थानिक आवश्यकतेनुसार बनवले गेले आहे.
  • महाराजा ट्रॅक्टर 2000 किलो ची लिफ्ट क्षमता पुरवते. त्यामुळे या ट्रॅक्टरला हायड्रोलिक चा महाराजा असे म्हटले जाते.
  • महाराजा ट्रॅक्टर मध्ये 3065 सी सी चे heavy-duty मायलेज इंजिन असून जे 50 एचपी श्रेणी मधील सगळ्यात कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा दर्जेदार कामासाठी जास्तीचा टॉर्क निश्चित करते.
  • सोनालिका च्या महाराजा ट्रॅक्टर मध्ये फिंगर टच कंट्रोल मुळे शेतकरी अन्य कृषी उपकरणाचा वापर सहजतेने करू शकतात.
  • सोनालिका छाया महाराज ट्रॅक्टर मध्ये शेतकऱ्यांसाठी एलइडी डीआयएल हेडलाईट आणि एलईडी टेल लाईट आहे. जय महाराजा ट्रॅक्टर चा दबदबा बनवून ठेवण्यामध्ये सक्षम आहेत.
  • या ट्रॅक्टर मध्ये आकर्षक मटेरियल रेड पेंट आणि आरामदायक रॉयल रेड सीट आहे. ज्या शेतकऱ्यांना अत्यंत पसंद आहे.

 

  • या ट्रॅक्टरला प्रो प्लस बंपर आणि अग्रोनोमिक रूपांमध्ये डिझाईन केल्या गेलेल्या स्टेरिंग मुळे शेतकऱ्यांना कामांमध्ये बिलकुल थकवा जाणवत नाही त्यामुळे जास्त वेळ पर्यंत शेतकरी ट्रॅक्टर द्वारे काम करू शकता.
  • इतकेच नाही तर सोनालिका च्या  महाराजा ट्रॅक्टर मध्ये हाय कूलिंग  रिंग फॅन हा  45 केवी रेडिएटर इंजिन ला थंड ठेवते त्यामुळे इंजिनचे  आयुष्य वाढते.

 

सोनालिका च्या 5जीट्रॅक्टर महाराजा डी आय -745lll ट्रॅक्टर ची किंमत

 सोनालिका च्या या फाईव्ह जी ट्रॅक्टर महाराजा डी आय 745lll ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत 6.60 -7.10 लाख रुपये आहे.

 

English Summary: sonalika tractor launch maharaja di 745iii trctor Published on: 05 September 2021, 10:54 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters