1. यांत्रिकीकरण

छोट्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल सोलर स्प्रेअर

देशात पाण्याचा तुटवडा भासत आहे. भुजल पातळीत घट दिवसेंदिवस होत आहे. अशात शेतात पिकांना पाणी देताना पाण्याचा अपव्यय नेहमी होत असतो. पाण्यासह ऊर्जाही व्यर्थ जात असते. याच बाबीचा विचार करुन कृषी क्षेत्रातील शोधकर्ते उपयोगासाठी योग्य पर्यायाचा शोध घेत आहेत. दरम्यान यावर काम करताना दुर्गापूर येथील सीएसआयआर (Central Institute of Mechanical Engineering Research) केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या संशोधन कर्त्यांनी सोलर पंप आणि सौर वृक्षानंतर आता सौर बॅटरीने चालणारे नवे स्प्रेअर विकसित केले आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
spreyer pump

spreyer pump

देशात पाण्याचा तुटवडा भासत आहे. भुजल पातळीत घट दिवसेंदिवस होत आहे. अशात शेतात पिकांना पाणी देताना पाण्याचा अपव्यय नेहमी होत असतो. पाण्यासह ऊर्जाही व्यर्थ जात असते. याच बाबीचा विचार करुन कृषी क्षेत्रातील शोधकर्ते उपयोगासाठी योग्य पर्यायाचा शोध घेत आहेत. दरम्यान यावर काम करताना दुर्गापूर येथील सीएसआयआर
(Central Institute of Mechanical Engineering Research) केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या संशोधन कर्त्यांनी सोलर पंप आणि सौर वृक्षानंतर आता सौर बॅटरीने चालणारे नवे स्प्रेअर विकसित केले आहे.

छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे स्प्रेअर खूप फायदेशीर ठरेल असे म्हटले जात आहे. दरम्यान या स्प्रेअर दोन प्रकार सादर करण्यात आले आहेत. एक बॅक पॅकचा प्रकार आहे, याची क्षमता ही पाच लिटर आहे. अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून हे बनविण्यात आले आहे. तर दुसरा प्रकार कॉम्पॅक्ट ट्रॉली स्प्रेअर हा आहे. याची क्षमता ही दहा लिटर आहे. छोट्या शेतकऱ्यांना लक्षात घेऊन हे विकसित करण्यात आले आहे. या फवाऱ्यांचा वापर लहान होल्डिंगमध्ये कीटकनाशके फवारण्या तसेच पाण्याचे फवारणी नियंत्रित करण्यासाठी केला जाऊ शकतो.

हे स्प्रेयर्स दोन स्वतंत्र टाक्या, फ्लो कंट्रोल आणि प्रेशर रेग्युलेटरने सुसज्ज आहेत. स्प्रेयरची ड्युअल-चेंबर डिझाइन या प्रणालीला दोन प्रकारचे द्रवपदार्थ ठेवता येते. फवारण्यांचा प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यासाठी फवारण्यांचे वैशिष्ट्ये आहे. विविध स्तरावर पाणी आणि कीटकनाशके फवारणीसाठी योग्य आहेत. दरम्यान सीएसआयआर- सीएमइआरआयचे संचालक प्राध्यापक (डॉ.) हरीश हिरानी म्हणतात की, हे स्प्रेअर छोटे आणि अल्प भूधारकांना आर्थिक- सामाजिक दुष्ट्या आर्थिक स्थैर्य देतात.


या पद्धती उष्ण आणि अर्ध शुष्क परिसरात कृषीसाठी नवे परिणाम दिसतील. कमी पाण्याचा उपयोग करुन स्प्रेअर्स प्रिसिशन एग्रीकल्च क्षेत्रात नवीन बदल घडून आणतील.पिकांच्या उत्पादनात कीटकनाशक महत्त्वपुर्ण भूमिका बजावत असतात. 

फरवणी दरम्यान कीटकनाशकांची नासाडी होत असते, त्याला कारण असते योग्य यंत्र नसणे. फवारणी दरम्यान माती, हवा, आणि पाणी स्रोत दुषित होत असते. सक्षम फवारणी पंप बनविण्यासाठी तणाव, क्षमता, पाण्याची क्षमता इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन फवारणी पंप बनविण्यात येते.  दरम्यान या फवारणी पंपासाठी इतर दुसऱ्या सामुग्री सारखे भांडे खाली करण्याची आवश्यकता नसते. हे नवीन फवारणी पंप ७५ टक्के पाणी आणि २५ टक्के वेळेची बचत करत असतात.

पिकांच्या स्थानानुसार, सिंचन, पानांच्या खाली आणि पिकांच्या खोडावरील कीटकापासून वाचविण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी, पाने व किटकांच्या हल्ल्यांच्या पृष्ठभागावर पाण्यावर आधारित सूक्ष्म उग्रपणा हे तंत्र पाणी आणि कीटकनाशकांच्या गरजा भागवून पाण्याचे रक्षण, मातीतील ओलावा आणि तणनियंत्रण राखण्यात प्रभावी भूमिका बजावू शकते. 

हे स्प्रेयर्स सौर बॅटरीद्वारे चालविल्या जातात.  त्यांच्या वापरामुळे, कृषी कामात डिझेलसारख्या जीवाश्म इंधनांवरील अवलंबन देखील कमी केला जाऊ शकतो.
शेतकरी हे फवारणी पंप सहज शिकू शकतात आणि शेतातही त्यांचा सहज वापर करू शकतात. दरम्यान या बॅकपॅक फवारणी पंपाची किंमत ही सहा हजार ते ११ हजार असू शकते.  तर ट्रॉली फवारणी पंपाची किंमत ही १२ हजार ते २० हजार रुपये असू शकते.

English Summary: solar spray pump useful for farmer Published on: 08 September 2021, 03:32 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters