सध्या आपल्याकडे शेतीत काम करणाऱ्या मजुरांची टंचाई जाणवत आहे. शेतमजुरीचे दरही वाढले आहेत. त्यामुळे शेतीचे यांत्रिकीकरण झपाट्याने होतेय. यांत्रिकीकरणामुळे कमी कष्टात, कमी वेळेत शेतीची कामे होतात. निविष्ठांचा कार्यक्षम वापर होऊन शेतीमालाची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढीसही हातभार लागतो. शेतीत ट्रॅक्टरची संख्या वाढली म्हणजे यांत्रिकीकरण वाढले आहे, असा आपला जमज होऊन बसला आहे.
परंतु आपला देश ट्रॅक्टरचलित, बिगर ट्रॅक्टरचलित अवजारांच्या वापरात मात्र पिछाडीवर आहे. भारतीय शेतीत उपयुक्त ठरणारी छोटी यंत्रे अवजारे उपलब्ध होत नाहीत, असा एनसीएईआरचा (राष्ट्रीय उपयोगिता आर्थिक संशोधन परिषद) अहवाल सांगतो. त्यामुळे देशात ट्रॅक्टरचा कार्यक्षम वापरही होताना दिसत नाही. अशावेळी देशात कृषी यंत्रे अवजारे क्षेत्रात संशोधन व विकासाची गरजही या अहवालात नमूद केली आहे.
देशातील यांत्रिकीकरणाबाबत अजून एक धक्कादायक बाब म्हणजे आपल्या वाढत्या यांत्रिकीकरणावर चीनमधील यंत्र अवजारे निर्माते पोसले जात आहेत. चीनमधील यंत्रे अवजारे उद्योग वाढला ते आपल्या गरजेनुसार देशात येत असतील तर त्याला हरकत असण्याचे कारण नाही. परंतु चीनमधील यंत्रे अवजारांच्या वाढत्या आयातीने भारतीय उद्योगाचे खच्चीकरण होत असल्यास ही बाब गंभीर आहे.
सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांना परतफेडीची ऐपत नसतानाही १ हजार २३ कोटी रुपयांचे कर्ज...
अशावेळी भारत सरकारने ही वाढती आयात रोखण्याऐवजी त्यास अनुदानाच्या कक्षेत आणले आहे. ही आपल्याच स्पर्धक विदेशी निर्यातदार देशाला स्वदेशी करातून पोसण्याची चूक केंद्र सरकार करीत असल्याची संतप्त प्रतिक्रियाही भारतीय यंत्रे अवजारे उद्योगातून व्यक्त होत आहे. आपल्या देशात जिरायती शेतीचे प्रमाण जास्त आहे. शेती छोट्या छोट्या तुकड्यांत विभागलेली आहे. दुर्गम डोंगराळ भागातील शेती क्षेत्रही २० टक्केच्या वर आहे.
आपल्याकडे वैविध्यपूर्ण पीक पद्धती आहे. अशा शेतीत बाहेरून आयात केलेली यंत्रे अवजारे जशीच्या तशी उपयुक्त ठरताना दिसत नाहीत. अशावेळी देशात यंत्रे अवजारे संशोधन आणि त्यांच्या व्यापारीकरणास पूरक धोरणाचा अवलंब होणे गरजेचे आहे. परंतु आपण अजूनही बाहेरची यंत्रे अवजारे आयातीवरच भर देत आहोत. आत्मनिर्भरतेच्या हा उलटा प्रवास असून तो यांत्रिकीकरणाबरोबर इतर अनेक बाबतीतही दिसून येतो, देशाला यांत्रिकीकरणात स्वयंपूर्ण व्हायचे असेल तर याबाबत संशोधन वाढवावे लागेल.
मिल्कोमीटर प्रत्येक दूध संकलन केंद्रावर असणे बंधनकारक करणार, शेतकऱ्यांना होणार फायदा..
यांत्रिकीकरणासाठीच्या संशोधनाला पायाभूत तसेच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. यासाठी मोठ्या निधीची तरतूद करावी लागेल. देशात यंत्रे अवजारे यांच्याबाबत झालेल्या संशोधनाचे व्यापारीकरण करण्यासाठी यंत्रे अवजारे विकसित करणाऱ्या उद्योजकांना पूरक धोरणाचा अवलंब करावा लागेल. यामध्ये उद्योजकांना संशोधनात सहभागी करून घेण्याबरोबरच स्वतंत्रपणे यंत्रे अवजारे विकसित करण्यासाठी खासगी उद्योजकांनाही बळ मिळायला हवे.
शेतकऱ्यांनो जनावरांमधील गंभीर आजार टाळण्यासाठी लसीकरणाची योग्य वेळ जाणून घ्या..
सरकारच्या ‘या’ निर्णयाने शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही, किसान सभेने थेट कारण सांगितले..
शूरवीर' म्हैसला तोडच नाही! वय 4 वर्षे, उंची 5.5 फूट आणि किंमत 15 कोटी, देशभरात प्रसिद्ध
Share your comments