1. बातम्या

Ambition:माहीची आता ड्रोन क्षेत्रात उडी, ड्रोन स्टार्टअप गरुड एरोस्पेस मध्ये गुंतवणूक

महेंद्रसिंग धोनी हे नाव क्रिकेट जगतातले एक सुप्रसिद्ध नाव असून जागतिक पातळीवर प्रसिद्ध असे नाव आहे. महेंद्रसिंग धोनी बद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती एक उत्तम क्रिकेटर ते सेंद्रिय शेती पासून ते कडकनाथ कोंबड्यांचे पालनयामध्ये धोनी चांगल्या प्रकारे काम करीत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
ms dhoni investment in drone garud airospace and be braand ambassador

ms dhoni investment in drone garud airospace and be braand ambassador

 महेंद्रसिंग धोनी हे नाव क्रिकेट जगतातले एक सुप्रसिद्ध नाव असून जागतिक पातळीवर प्रसिद्ध असे नाव आहे. महेंद्रसिंग धोनी बद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती एक उत्तम क्रिकेटर ते सेंद्रिय शेती पासून  ते कडकनाथ कोंबड्यांचे पालनयामध्ये धोनी चांगल्या प्रकारे काम करीत आहे.

परंतु आता धोनीने ड्रोन क्षेत्रातील स्टार्टअप गरुड एरोस्पेस मध्ये गुंतवणूक केली असून या कंपनीचा तो आता शेअर होल्डर्स बनला आहे.इतकेच नाही तर या कंपनीचा तो  ब्रँड ॲम्बेसिडर नियुक्त करण्यात आला आहे.याबाबतची घोषणा कंपनीने 6 जून रोजी केली.

गरुड एरोस्पेस ही कंपनी चेन्नई मध्ये असून अलीकडेच या कंपनीने शेतीला पाठिंबा देण्यासाठी एक योजना जाहीर केली आहे. याबाबत कंपनीने एप्रिल महिन्यात सांगितले होते की, गावपातळीवर असलेल्या उद्योजकांना किंवा कीटकनाशक आणि खतांच्या किरकोळ विक्रेत्यांना ड्रोन विकण्यासाठी मॉडेलवर काम करत आहे.

नक्की वाचा:तुर्कीने भारताचा गहू नाकारला, परंतु 'या' देशाने स्वीकारला, जाणून घ्या त्यामागील कारणे

गरुड एरोस्पेस बनवणार पहिला ड्रोन युनिकॉर्न

 या कंपनीचे 26 शहरांमध्ये 300 ड्रोन आणि 500 पायलट आहेत. गरुड एरोस्पेस ही आता ड्रोन युनिकॉर्न स्टार्टअप बनण्याच्या मार्गावर आहे.

ही कंपनी ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवेने अर्थात स्विगीने निवडलेल्या चार ड्रोन स्टार्टअप पैकी एक आहे.  ज्याची किराणा सेवा इन्स्टामार्टसाठी पायलट प्रोजेक्ट आहे. पथदर्शी प्रकल्पांतर्गत किराणा सामानाची डिलिव्हरी ड्रोन द्वारे केली जाणार आहे.

 ड्रोनच्या वापराने शेती अशा पद्धतीने बदलू शकते

 भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर या बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत सातव्या क्रमांकाचा देश आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्‍येला अन्‍न सुरक्षा देणे अत्यंत आव्हानात्मक आहे.

त्यामुळे आता पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक आणि तांत्रिक शेतीचा विकास आणि विस्तार होणे खूप गरजेचे असूनएक लागवडीचा वाढता खर्च आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान होत आहे.

अशा या परिस्थितीत ड्रोन सारख्या तंत्रज्ञानाद्वारे अचूक शेती केल्यास देशातील शेतकऱ्यांना चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो व ड्रोनचा वापर करून शेतकरी कमी खर्च व कमी वेळात चांगले उत्पन्न वाढवू शकतात. पारंपारिक पद्धतीने कीटकनाशकांची फवारणी केल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो परंतु ड्रोनच्या साह्याने फवारणीचे होणारे वाईट परिणाम टाळता येऊ शकतात.

नक्की वाचा:मोठ्या मनाची कोंबडी; भर वादळात दिला मांजरीच्या पिल्लांना आसरा

नक्की वाचा:Low Investment bussiness: कमी खर्चात करा हा व्यवसाय आणि कमवा लाखो रुपये

English Summary: ms dhoni investment in drone garud airospace and be braand ambassador Published on: 06 June 2022, 08:05 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters