शेतीमध्ये दिवसेंदिवस अनेक बदल होत चालले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी झाले आहेत. यांत्रिकीकरणाचा देखील वापर दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना मात्र काही शेतकरी हे जुनेच प्रयोग करत आहेत. यातून ते अनेक प्रकारे किमया साधत आहेत. तसेच यंत्रांसाठी अनेक प्रकारे मोठा खर्च देखील होत असतो.
यामुळे शेतकरी अनेक प्रकारे खर्च कमी करत असतात. त्यामुळे वेगवेगळे प्रयोग न करता अनेक शेतकरी हे पारंपरिक पिकांवरच भर देतात. आता मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर गावच्या एका तरुण शेतकऱ्याने कोणतेही गऱ्हाणे न करता पीक पध्दतीमध्ये बदल केला आणि उत्पादनवाढीवर भर दिला आहे. पीक फवारणीसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री न घेता केलेले जुगाड आता चर्चेचा विषय ठरला आहे.
त्यांनी ‘नंदी ब्लोअर’ तयार केला असून याद्वारे ते शेतात फवारणी करत आहेत. ते द्राक्षासह इतर पिकांची फवारणी करीत आहे. यामुळे ते फायदेशीर आहे. यासाठी फक्त 40 हजार रुपये खर्च केला गेला आहे. यासाठी 6 ते 7 लाख रुपयांचा खर्च येतो. ज्ञानेश्वर हरीदास चव्हाण या शेतकऱ्याने पीक फवारणीसाठी एक अनोखा जुगाड केला आहे.
सर्वात लहान शेळी आणि सर्वात जास्त पैसे मिळवून देणारी शेळी, शेतकऱ्यांना होणार फायदा
दरम्यान, चव्हाण यांनी दोन वर्षापूर्वी दोन एकर द्राक्षे लागवड केली होती. याच्या फवारणीसाठी मोठा खर्च होत होता. सोबतच वेळ ही जास्त लागत होता. यामुळे मोटारसायकलच्या जुन्या चाकांचा वापर आणि लोखंडी अँगलचा वापर करीत केवळ पाच हजारात गाडा तयार केला आहे. यामाध्यमातूच ते आता पीक फवारणीचे काम करीत आहेत.
देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीनंतर सर्वात मोठी आखाडा पार्टी, महेश लांडगेंचा आखाड जोरात
त्यांनी पाठीमागील बाजुस एसटीपी पंप बसवला आहे. त्यापुढे 5 एचपीचे डिझेल इंजिन आणि दोनशे लिटर क्षमतेचा आडवा बॅरल ठेवला आहे. त्यामध्ये 20 एमएम ड्रीपच्या नळ्यांचा वापर केला. बाजारातून खरेदीकरुन फवारणीसाठी दोन्ही बाजुला चार-चार स्प्रे गन बसवले. पुढे एक बैल जुंपता यावा अशी व्यवस्था केली. यासाठी त्यांना सगळा मिळून ४० हजार खर्च आला आहे.
महत्वाच्या बातम्या;
भारीच की! शेतकरी मित्रांनो 'या' पिकाची करा शेती आणि 3 महिन्यात लखपती व्हा, जाणून घ्या..
कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी भाजप खासदाराची निवड, शरद पवारांच्या जागी वर्णी लागल्याने राष्ट्रवादीला धक्का
एका वर्षात 78 वेळा पेट्रोलचे दर वाढवले, आपचा खासदार संसदेत थेट मोदींना भिडला..
Share your comments