जगातील तीसरी सगळयात मोठी ट्रॅक्टर कंपनी असणाऱ्या मैसी फ़र्ग्यूसन ट्रॅक्टरने कंपनीने महाराष्ट्रात नवीन ट्रॅक्टर लॉन्च केला आहे. या ट्रॅक्टरचे नाव मैग्नाट्रैक आहे. कोल्हापुर मध्ये एका भव्य समारोहात क्रांतिकारी मैग्नाट्रैक सीरीज लॉन्च केली आहे. मैग्नाट्रैक ट्रॅक्टर सीरीज विश्व स्तरीय स्टाइल, उन्नत टेकनॉलॉजि, जास्तीची शक्ती, कमी ऑपरेटिंग खर्च मध्ये अविश्वनीय परफारमेंस मध्ये आहे.
मैसी फ़र्ग्यूसन मैग्नाट्रैक ट्रॅक्टरची वैशिट्ये
1. ऊस वाहतूक, बांधकाम मालाची वाहतूक सारख्या जड वाहतूक कार्यासाठी उत्कृष्ट
2. हेवीड्यूटी माल वाहतुकीसाठी उच्च टॉर्क इंजिन, कमी ऑपरेटिंग कॉस्ट, आंतरराष्ट्रीय स्टाइलिंग आणि उत्तम सोयीस्कर डिझाइन
3. रिवर्सिबल मोल्डबोर्ड प्लो, बेलर आणि थ्रेशर सारख्या विविध कृषि कार्य साठी उपयुक्त
4. नवा मैसी फ़र्ग्यूसन 8055 मैग्नाट्रैक, 50 hp रेंज मध्ये येतो आणि मैग्नाट्रैक सीरीज मध्ये पहिला ट्रॅक्टर आहे.
टैफेच्या CMD मल्लिका श्रीनिवासन यांनी सांगितले कि, "60 वर्षा पेक्षा अधिक, टैफे आणि मैसी फ़र्ग्यूसन ब्रांडने महाराष्ट्रच्या शेतकऱ्यानं सोबत मजबूत संबंध बनवले आहेत. महाराष्ट्र राज्याचे शेतकरी खूप प्रगतिशील आहेत. जे उत्पादकता वाढविण्यासाठी आणि कृषी कार्या मध्ये चांगले मूल्य प्राप्त करण्यासाठी ते नव नवीन टिकनॉलॉजि आत्मसात करत आहेत.
ताकत, स्टाइल, आराम आणि कार्यक्षमता अशी नवीन मैग्नाट्रैक सिरीज लाँच केली आहे. आम्ही भारताच्या ऊस उत्पादन करणाऱ्या राजधानी मध्ये, म्हणजेच कोल्हापुर मध्ये, हेवीड्यूटी मालवाहतुक करणारा प्रिमियम ट्रॅक्टर - मैग्नाट्रैक लाँच करत आहोत, ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे.”
महत्त्वाच्या बातम्या :
खुशखबर! शेतकऱ्यांचा शेतीमाल बांधावरून थेट सातासमुद्रापार जाणार, असा घ्या योजनेचा लाभ..!
धरणग्रस्तांना मिळणार हक्काची जमीन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
उत्कृष्ट दर्जाच्या मैग्नाटॉर्क इंजिनसह तयार असलेला हा प्रिमियम माल वाहतुकीचा ट्रॅक्टर अधिकतम टॉर्क आणि उच्च इंधन कार्यक्षमता प्रदान करतो. आपल्या श्रेणी मध्ये सर्वश्रेष्ठ 200 Nm च्या उच्चतम टॉर्क सोबत, हा ट्रॅक्टर सहजपणे ओबडधोबड आणि कुठल्या पण परिस्थिती मध्ये भारी ट्रॉलीला आरामात ओढू शकतो.
सोयाबीनला अच्छे दिन..! दरात झाली 'इतकी' वाढ; शेतकऱ्यांना होणार फायदा
रस्त्यावर उच्च स्पीडसह विलक्षण उत्पादकता देण्यासाठी ट्रॅक्टरचे इंजिन आणि ट्रान्समिशन हे चांगल्या प्रकारे सुसंगत केले आहे आणि या मुळे उच्च गतीने ट्रॅक्टर माल वाहतूक आणि उच्च ईंधन बचत संभव होते. गुणवत्ता आणि विश्वासार्हतेसाठी प्रशंसित, टैफे ची उत्पादने आणि सेवा युरोप आणि अमेरिकेतील विकसित देशांसह जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये उपस्थित आहेत.
Share your comments