1. यांत्रिकीकरण

Mahindra 575 DI XP ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांचा चांगला मित्र,या वैशिष्ट्यांमुळे ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांच्या पसंतीचे

महिंद्रा 575 DI XP या ट्रॅक्टरची निर्मिती महिंद्रा ट्रॅक्टर्स कडून केली जाते. या ट्रॅक्टरच्या विविध प्रकारच्या वैशिष्ट्यांमुळेया ट्रॅक्टर ची मागणी कायम असते.त्यामुळे याट्रॅक्टर अशी मागणी वेळेत पूर्ण करण्यामध्ये समस्या निर्माण होतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
mahindra tractor is so useful to farmer for hard work like as rotavetor and powing

mahindra tractor is so useful to farmer for hard work like as rotavetor and powing

महिंद्रा 575 DI XP या ट्रॅक्‍टरची निर्मिती महिंद्रा ट्रॅक्टर्स कडून केली जाते. या ट्रॅक्टरच्या विविध प्रकारच्या वैशिष्ट्यांमुळेया ट्रॅक्टर ची मागणी कायम असते.त्यामुळे याट्रॅक्टर अशी मागणी वेळेत पूर्ण करण्यामध्ये समस्या निर्माण होतात.

या ट्रॅक्टर ची मागणी बाजारात  कायम असतेआणि या मागणीत सातत्याने वाढ होत आहे.अशा परिस्थितीत जरशेतकऱ्यांना शेतामध्ये उच्च उत्पादन आणि सोबतच उच्च गुणवत्ता हवी असेल तरमहिंद्रा 575 एक्सपी ची निवड करून खरेदी करू शकतात.एका सर्वेक्षणानुसार भारतीय शेतकरी महिंद्राकंपनीच्या ट्रॅक्टरला सगळ्यात जास्त पसंती देतात. हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय ट्रॅक्टर मानले जाते. या लेखामध्ये आपण महिंद्रा 575 डी आय एस पी प्लसया ट्रॅक्‍टरची किंमत, व इतर यांत्रिक वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत.

Mahindra 575 DI XP प्लस ट्रॅक्टर ची इंजिन क्षमता(Capacity Of Engine)

 हे ट्रॅक्टर आपल्या देशातच नाही तर विविध देशांमध्ये देखील खूप लोकप्रिय आहे. महिंद्रा 575 डीआय एक्स पी प्लस 47 एचपी ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरची इंजन क्षमता 3054 सीसी असून यामध्ये चार सिलेंडर आहेत जे आरपीएम दोन हजार 100 रेटेड इंजिन उत्पन्न करते. जे ट्रॅक्टर खरेदीदारांसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय ट्रॅक्टर मॉडेल आठ फॉरवर्ड +दोन रिव्हर्स गिअर सोबत एक मजबूत गेअर बॉक्स यामध्ये आहे. महिंद्रा 575 डी आय एक्सपी प्लस p.t.o. एचपी 42 एचपी आहे. शेतातील कठीण कामे करण्यासाठी या ट्रॅक्टरचे शक्तिशाली इंजिन शेतकऱ्यांना मदत करते.

 या ट्रॅक्टर ची वैशिष्ट्ये(Features Of This Tractor)

1- महिंद्रा ट्रॅक्टर ब्रांड आपल्या उन्नत आणि आधुनिक वैशिष्ट्यांमुळे भारतीय शेतकऱ्यांमध्ये खुप प्रसिद्ध आहे.

2- महिंद्रा 575 डी आय एक्सपी प्लस ट्रॅक्टर मध्ये सिंगल क्लच आहे जो शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे काम करण्यात मदत करतो.

3- या ट्रॅक्टर च्या स्टेरिंग चा प्रकार पावर स्टेरिंग असून ज्यामुळे ट्रॅक्टरला नियंत्रित करणे एकदम सोपे जाते व जलद रित्या काम करणे शक्य होते.

4- या ट्रॅक्टरच्या हायड्रोलिक उचलण्याची क्षमता 1500 किलोग्रॅम आणि 65 लिटर इंधन टॅंकची क्षमता आहे.

5- या ट्रॅक्टरचा मायलेज एकदम मजबूत असून कमीत कमी इंधनात जास्तीचे काम करतो त्यामुळे शेतकऱ्यांचा जास्तीचा खर्च वाचतो.

6- या ट्रॅक्टर मध्ये टूल्स, हुक, टॉप लिंक, कॅनोपी, बंपर सारखे ॲक्सेसरीज देखील उपलब्ध आहेत.

7- हे ट्रॅक्टर सहा वर्षाच्या वारंटी सोबत येते त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्‍वास मजबूत होतो.

8- हे ट्रॅक्टर कल्टीवेटर, रोटावेटर, नांगरणी व इतर उपकरणांसाठी खूप उपयोगी मानले जाते.

9- सद्यपरिस्थितीत बाजारांमध्ये कमी किमतीत एकापेक्षा एक ट्रॅक्टर उपलब्ध आहेत परंतु जबरदस्त फीचर्स असणारे महिंद्रा 575 एक्सपी प्लस या स्पर्धेमध्ये देखील टिकून आहे व याला जास्त मागणी आहे.

 या ट्रॅक्टरची किंमत(Price Of This Tractor)

 महिंद्रा 575 एक्सपी 1 बहुद्देशीय ट्रॅक्टर असून शेतिच्या सगळ्या कामांसाठी एकदम मदतगार आहे. या ट्रॅक्टर ची किंमत सहा लाख ते सहा लाख 45 हजार रुपये असून  शेतकऱ्यांच्या आर्थिक बजेट नुसार उपयुक्त अशी किंमत आहे. या ट्रॅक्टर ची ऑन रोड किंमत स्वस्त असून राज्यानुसार ती बदलत राहते.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Fertilizer Tips:ऊस शेतीसह सगळ्याच पिकांसाठी उपयुक्त आहे कोंबडी खत, रासायनिक खतांना ठरतोय उत्तम पर्याय

नक्की वाचा:काय म्हणता! या गायीच्या सडाखाली दुधाचे भांडे धरताच गाय दूध द्यायला सुरवात करते,नेमकी कुठे आहे ही गाय?

नक्की वाचा:खरीप हंगामात मधुमक्याची शेती ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान; जाणुन घ्या मधूमका शेतीविषयी बहुमूल्य माहिती

English Summary: mahindra tractor is so useful to farmer for hard work like as rotavetor and powing Published on: 14 May 2022, 02:33 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters