1. यांत्रिकीकरण

Agri Related:' 'महा-उस नोंदणी ॲप' आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे,वाचा सविस्तर

उसाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बर्याच प्रकारच्या समस्या निर्माण होतात. यासाठी शासनाने आता शेतकऱ्यांना ऊस नोंदणी करण्याच्या संबंधित कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी साखर आयुक्तालयाने 'महा उस नोंदणी अँप' विकसित केले असून हे ॲप शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरणार आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
canecrop registration app

canecrop registration app

 उसाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बर्‍याच प्रकारच्या समस्या निर्माण होतात. यासाठी शासनाने आता शेतकऱ्यांना ऊस नोंदणी करण्याच्या संबंधित कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी साखर आयुक्तालयाने 'महा उस नोंदणी अँप' विकसित केले असून हे ॲप शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरणार आहे.

नक्की वाचा:Sugar Production; देशातील साखरेचं अतिउत्पादन ही अर्थव्यवस्थेसाठी समस्या, साखरेचं उत्पादन कमी करा..

कारण बऱ्याच भागांमध्ये उस नोंदणीबाबत विविध प्रकारच्या तक्रारी असतात. ऊस नोंदीबाबत समस्या निर्माण झाल्यास उसाची तोड होण्याबाबत शेतकऱ्यांना खूप मोठी समस्या निर्माण होते. परंतु आता या ॲपच्या माध्यमातून उसाची नोंद होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.

बरेच शेतकरी साखर कारखान्यात ऊस क्षेत्राची नोंद करतात अशा शेतकऱ्यांना देखील आता या ॲपच्या माध्यमातून त्यांच्या नोंदणीची माहिती मिळू शकेल. याच्यामुळे आता शेतकर्‍यांना अगदी घरबसल्या उसाची नोंद करता येणे शक्य होणार आहे.

नक्की वाचा:Agri News: 'या' तारखेपासून सुरू होईल या वर्षीच्या ऊस गळीत हंगाम,वाचा माहिती

नेमके काय आहे 'महा-उस नोंदणी ॲप'?

 शेतकरी बंधूंना हे ॲप आजपासून गुगल प्ले स्टोअर उपलब्ध करून देण्यात आले असून ते डाउनलोड देखील करता येणार आहे. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर या हंगामातील ऊस क्षेत्राची माहिती यामध्ये भरावी लागेल.

ॲपमध्ये ऊस लागवडीचा जिल्हा,तालुका,गाव व गट नंबर इत्यादीनुसार माहिती भरल्यावर इतर माहितीसह ऊस क्षेत्राची माहिती भरावी. त्यानंतर कोणत्या कारखान्याला या ऊस नोंदणीसाठी कळवायचे यासाठी कारखान्यांचे तीन पर्याय यामध्ये तुम्हाला भरता येतील.

त्यानंतर साखर आयुक्तालय ही माहिती संबंधित जवळच्या कारखान्याकडे पाठवून देईल.त्यानंतर शेतकऱ्याला साखर कारखान्यांमधील आपली उसाची नोंदणीची संपूर्ण माहिती पाहता येईल. महा उस नोंदणी ॲपच्या माध्यमातून साखर आयुक्तालय राज्यातील 100 सहकारी व 100 खाजगी असे एकूण 200 कारखान्याकडे ऊस नोंदणीची माहिती पाठवू शकेल.

नक्की वाचा:Top Goat Breed: शेतकरी बंधूंनो! या शेळीमध्ये आहे 5 लिटर प्रति दिवस दूध देण्याची क्षमता,वाचा माहिती

English Summary: mahaus nondani app is so benificial for cane crop productive farmer Published on: 30 August 2022, 02:29 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters