1. बातम्या

धक्कादायक! मंत्रालयाबाहेर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा अखेर उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना भावनिक पात्र लिहून आत्महत्या न करण्याचे आवाहन केले होते.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
farmer sucide

farmer sucide

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) शेतकरी आत्महत्येचे (Farmer suicide) प्रमाण वाढले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पावसाळी अधिवेशनात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शेतकऱ्यांना भावनिक पात्र लिहून आत्महत्या न करण्याचे आवाहन केले होते.

मंत्रालयाबाहेर अनेक वेळा शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पावसाळी अधिवेशन सुरु (Monsoon session) असताना एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्या शेतकऱ्याला लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्या शेतकऱ्याचा मृत्यू (Death of a farmer) झाला आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार नवा वेतन आयोग? जाणून घ्या किती असेल पगार...

हा शेतकरी उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी गावचा होता. सुभाष भानुदास देशमुख (Subhash Bhanudas Deshmukh) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. अंगावर पेट्रोल ओतून सुभाष देशमुख यांनी मंत्रालयाबाहेर पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. मंत्रालयाबाहेर असलेल्या पोलीस रक्षकांनी वेळीच धाव घेत पेट्रोल ची बाटली घेत आग विझवली.

नादच खुळा! १ एकर उसाच्या फडावर आठ मिनिटांत फवारणी

देशमुख हे या आगीमध्ये गंभीर जखमी झाले होते. अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. देशमुख यांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने जे.जे. रूग्णालयात (J.J. Hospital) हलवण्यात आले होते. गावाकडे जमीन बळकावल्याच्या वादातून देशमुख यांनी मंत्रालयाबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! कांदा 400 रुपये आणि टोमॅटो 500 रुपये किलो
मारुती सुझुकीच्या या गाड्या देतायेत सर्वाधिक मायलेज; किंमतही आहे कमी

English Summary: The farmer was set on fire outside the ministry finally died during the treatment Published on: 29 August 2022, 05:22 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters