सध्याचे युग हे यंत्रयुग आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वेगळ्या प्रकारच्या यंत्रांचा वापर होऊ लागल्याने कितीही बिकट आणि कष्टाची कामे अगदी सहज रित्या आणि पटकन होतात.
खासकरून शेतीमध्ये यंत्र क्रांतीने खूप मोठा बदल केला असून अगदी असामान्य कष्टाची कामे अगदी सहजपणे करता येतील असे यंत्र शेती क्षेत्रात विकसित करण्यात आली आहेत. मग ती शेतीची पूर्व तयारी असो की पिकांची काढणी, कापणी इत्यादींत पर्यंत यंत्र विकसित करण्यात आली आहेत.
आता आपण जमिनीचा विचार केला तर पिकांच्या लागवडीसाठी समतल जमिनीची फार आवश्यकता असते. कारण पिकांना योग्य प्रमाणे पाण्याचा पुरवठा हा समतल जमिनीतच व्यवस्थित करता येतो. जर जमीन उंच म्हणजेच खाली वर असेल तर बऱ्याच प्रकारच्या समस्या शेती करताना तयार होतात अशी जमीन समतल करणे एवढे सोपे काम नाही.
परंतु आता या कामासाठी सुद्धा शास्त्रज्ञांनी एक यंत्र विकसित केले असून अशी उंच-सखल जमीन समतल करण्यासाठी अगदी कमीत कमी खर्चात याचा वापर करता येणे शक्य आहे. या उपयुक्त यंत्राचे नाव आहे लेझर लँड लेव्हलर हे होय.
लेझर लँड लेव्हलर एक उपयुक्त यंत्र
या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये लेझर किरणांचा वापर करून तुमच्या उंच आणि सखल जमिनीचा अचूक आणि प्रभावीपणे एका मापात समतल केली जाते. उंच जमिनीची माती काढून खालच्या जमिनीत पडते. त्यामुळे जमिनीचे सपाटीकरण अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चात करणे सोपे झाले आहे.
या यंत्रामध्ये एकत्रित कम्प्युटराइझ्ड तंत्रज्ञान आणि ट्रान्समीटर फील्ड समतल करण्याची जी पद्धत आहे ती एकदम सोपी करते. या यंत्रामध्ये ट्रान्समीटर आणि स्केल शेताच्या विविध भागांची उंची चिन्हांकित करते आणि शेतात कुठे आणि किती माती कमी किंवा जास्त आहे हे अगदी अचूकपणे स्पष्ट होते.
जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी अगोदर त्या शेताची सरासरी उंची किती आहे हे ठरवावे लागते त्यानंतर खालच्या ठिकाणी मातीचा भराव करून जमीन सपाट केली जाते.
लेझर लँड लेव्हलरचे फायदे
1- या यंत्राच्या वापराने जमीन समतल केल्याने पिकांची पाणी वापर कार्यक्षमता वाढते.
2- पिकांना व्यवस्थित पाण्याचा पुरवठा वेळेत झाल्याने उत्पादनात आणि धान्याच्या गुणवत्तेत वाढ होते.
3-पिक संचय समान आहे.
4- शेतामध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी होतो व तणांची समस्या मिटते. त्यामुळे निदनी वगैरेचा खर्च कमी होतो.
5- पिक एकाच वेळी काढण्यासाठी परिपक्व होते.
6- तसेच शेताच्या विविध भागांमध्ये पाटवनांसाठी बंधारा करण्याची गरज नाही.
7- यामध्ये पिकांना पाण्याची गरज कमी आणि 30 ते 40 टक्के पाण्याच्या वापरामध्ये बचत होते.
नक्की वाचा:भाताची सुधारित लागवड आणि अधिक उत्पादनासाठी 'या' पद्धतीचा अवलंब करा
अशा पद्धतीने काम करते लेझर लँड लेवलर
शेतामध्ये मातीच्या मोठ्या गुठळ्या तयार होऊ नयेत म्हणून योग्य ओलावा आला की शेताची चांगली नांगरट करावी आणि पीक व तणांचे अवशेष शेता मधून काढून टाकावेत. नंतर समतल करायच्या जमिनीच्या फिल्ड चे वरचे आणि खालचे भागा चिन्हांकित करावी
आणि लेझर लँड लेव्हलर मध्ये इन्स्टॉल असलेल्या ट्रान्समीटर आणि स्केल द्वारे फिल्ड च्या वेगवेगळ्या भागातील उंची आणि खोली मोजा आणि चिन्हांकित करा. मोजलेल्या सर्व उंचीवरून फील्ड ची सरासरी उंची शोधा व यावरून सपाटीकरण करताना शेतातील माती कुठून व किती प्रमाणात घ्यायची हे कळते.
शेत सपाट करणे.
1- लँड लेझर लेव्हलर बकेट शेताच्या सरासरी उंची च्या जवळ असलेल्या चिन्हावर ठेवा.
2- बकेट कटिंग ब्लेड जमिनीच्या पृष्ठभागापासून एक ते दोन सेंटिमीटर उंचीवर सेट करा.
3- शेतात ट्रॅक्टर ला वरच्या चिन्हांकित भागापासून खालच्या भागापर्यंत गोलाकार दिशेने चालवा व जिथून माती काढली आहे तिथून दुसर्या ट्रॅक्टरने नांगरणी करावी. मशीनच्या बकेटमध्ये माती झाल्यावर वेगवेगळ्या भागांची उंची पुन्हा मोजा आणि सपाटीकरण व्यवस्थित झाले आहे की नाही याची खात्री करा.
नक्की वाचा:Tyre Care:'या' गोष्टी ठेवा लक्षात,उन्हाळ्यात नाही फुटणार तुमच्या ट्रॅक्टरचे टायर
Share your comments