भारत कृषिप्रधान देश आहे आपल्या देशाची अर्थव्यवस्था हि कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. म्हणून कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक सरकारी तसेच गैरसरकारी कंपन्या कार्य करीत असतात. जिओ या कंपनीने देखील भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी या अनुषंगाने एक पाऊल कृषी क्षेत्राकडे टाकले आहे. जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडची उपकंपनी एस्टेरिया एयरोस्पेसने एंड-टू-एंड ड्रोन ऑपरेशन प्लॅटफॉर्म लाँच केले आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, जिओची ही उपकंपनी भारतीय बाजारात विक्रीसाठी ड्रोन तयार करत असते. या कंपनीने तयार केलेले एंड टू एंड ड्रोन ऑपरेशन प्लॅटफॉर्म हे एक क्लाऊड बेस सॉफ्टवेअर आहे. कंपनीचा हा प्लॅटफॉर्म कृषी, सर्वेक्षण, पाळत ठेवणे, औद्योगिक तपासणी आणि सुरक्षा यासारख्या क्षेत्रांसाठी एंड-टू-एंड ड्रोन सोल्यूशन्स प्रदान करण्यासाठी सक्षम आहे.
स्कायडेक विषयी बोलायचे झाले तर ही एक केंद्रीकृत व्यवस्थापन प्रणाली आहे जी ड्रोनच्या उड्डाणाची विविध परिमाणे आणि संबंधित डेटा रेकॉर्ड करते आणि त्यांना विशेष विकसित डॅशबोर्डवर प्रदर्शित करण्यास सक्षम असते.
ड्रोन डेटावर प्रक्रिया करणे, डेटाचे व्हिज्युअलायझेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे डेटाचे विश्लेषण करण्याची सुविधा देखील या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय ड्रोन फ्लाइटचे वेळापत्रक बनवण्यापासून ते ड्रोन फ्लीटचे व्यवस्थापन करण्यापर्यंतचे कामही या सॉफ्टवेअरद्वारे करता येणे आता शक्य झाले आहे.
Asteria Aerospace चे सह-संस्थापक आणि संचालक नील मेहता यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “ड्रोन ऑपरेशनसाठी नियमांचे सरळीकरणं झाल्याने अर्थात नियमांना शिथल करण्यात आल्याने तसेच सरकारने ड्रोन क्षेत्राला चालना देण्यासाठी धोरण अंगीकारले असल्याने त्यांची मागणी आता मोठी वाढली आहे. मित्रांनो Asteria ही भारतातील एक प्रमुख ड्रोन तयार करणारी कंपनी आहे.
निल मेहता यांनी पुढे माहिती देतांना सांगितले की, Skydeck लाँच करून, त्यांनी एकाच इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्मद्वारे हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि ऑपरेशनल सोल्यूशन्स यासारखी सर्व वैशिष्ट्ये प्रदान केली आहेत. स्कायडेक हे प्लॅटफॉर्म ड्रोनचा वापर सुव्यवस्थित करण्यास, फ्लाइट-संबंधित डेटा प्रविष्ट करण्यास आणि एकत्रित डिजिटल डेटाला व्यवसाय कल्पनांमध्ये रूपांतरित करण्यात मदत करते.
Skydeck च्या एंड-टू-एंड सोल्युशनमध्ये भारतीय कृषी क्षेत्राचा लँडस्केप अर्थात मुखवटा बदलण्याची ताकद आहे. यामुळे भारतीय कृषी क्षेत्राचा लवकरच कायापालट बघायला मिळू शकतो असा दावा कंपनीद्वारे केला जात आहे. याचा उपयोग पिकाची लक्षणे अचूकपणे माहिती करण्यासाठी, कीटकांचे निरीक्षण करण्यासाठी, खत, पाणी इ. साठी, बांधकाम आणि खाण उद्योगांसाठी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
SkyDeck प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी आणि अचूक इन्व्हेंटरी रेकॉर्ड राखण्यासाठी साइट सर्वेक्षण करण्यासाठी ड्रोन-आधारित हवाई डेटा वापरते. तेल आणि वायू, दूरसंचार आणि उर्जा यासारख्या गंभीर पायाभूत सुविधा क्षेत्रांसाठी वापरले जाणार आहे. SkyDeck देखरेखीसाठी, धोके ओळखण्यासाठी आणि बदलांची नोंद करण्यासाठी मालमत्तेचे डिजिटायझेशन आणि तपासणी करण्यासाठी ड्रोनची शक्ती वापरत असते.
Skydeck विविध सरकारी योजना आणि कार्यक्रम जसे की स्वामीत्व योजना, स्मार्ट सिटीज, अॅग्रीस्टॅक आणि इतर विकास प्रकल्पांमध्ये ड्रोनच्या ताफ्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी देखील मदत करू शकते. एकंदरीत Skydeck चे वैशिष्ट्ये बघता भारतात लवकरच कृषी क्षेत्रात एक मोठी क्रांती घडून येणार असून भारतीय शेती आता हायटेक बनेल आणि कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढण्यास मदत होणार आहे.
संबंधित बातम्या:-
आनंदाची बातमी! ठिबक सिंचन प्रणालीसाठी आता 13 दिवसात मिळणार 80% अनुदान; वाचा सविस्तर
Pm Kisan: ई-केवायसी झाली नाही तरी मिळतील का 2000 रुपये? वाचा काय आहेत शेतकऱ्यांच्या अडचणी
Share your comments