आजच्या काळात ट्रॅक्टर खरेदी करणे खूप सोपे झाले आहे. फायनान्सवर कोणीही ट्रॅक्टर खरेदी करू शकतो. परंतु जर ते सर्वात कठीण असेल तर त्याची काळजी घेणे आणि योग्य वेळी त्यातील समस्यांचे निराकरण करणे हे होय.
ट्रॅक्टर मध्ये सगळ्यात मोठी समस्या म्हणजे उन्हाळ्यात टायर्सची वारंवार झीज होणे ही होय.आजच्या लेखात टायर्स मेंटेनन्स बद्दल आपण जाणून घेऊ. टायरची काळजी घेण्याच्या काही पद्धती आपण या लेखात जाणून घेऊ.
उन्हाळा पूर्वी करा टायरची तपासणी
उन्हाळ्यात ट्रॅक्टर टायर्सक्टर टायर्स पुन्हा पुन्हा खराब होतात, त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वी तुमच्या टायर्स जास्त जुने नाहीत याची तपासणी करून घ्यावी. जर टायर्स जुने झाली असतील आणि त्यात काही दोष असेल तर ते ताबडतोब बदलणे आवश्यक आहे.
यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे एकाच वेळी चारही टायर बदलण्याची वाट पाहू नका, जर एखादा टायर बदलायचा असेल तर लवकरच नवीन टायर घ्या आणि टायर बदलला.
टायरचे हवा नियमितपणे तपासत राहा
उन्हाळ्यात ट्रॅक्टर कामासाठी वापरण्यापूर्वी टायरमधील हवेचा दाब नक्की तपासा. जेणेकरून टायर सुरक्षित राहू शकेल. टायरमध्ये योग्य हवा नसल्यास ते कधीतरी फुटू शकते व एखादा अपघात घडू शकतो. म्हणूनच टायरची हवा वेळोवेळी तपासणे फार महत्त्वाचेआहे.
टायरची पकड अर्थात ग्रीप तपासत राहणे
अनेकदा लोक टायर योग्यवेळी बदलत नाहीत, त्यामुळे टायरचे पकड ढासळते आणि टायर एकतर वारंवार पंचर होतो किंवा फुटतो. त्यामुळे अशी चूक कधीही करू नका.
टायरची पकड ढासळली असेल आणि त्यात क्रॅक आले असतील तर लवकरात लवकर तो बदलण्याचा प्रयत्न करा.
उपाय छोटे छोटे आहेत परंतु खूपच महत्त्वाचे आहेत. या तीनही गोष्टींची काळजी घेतली तर ट्रॅक्टर चे टायर दीर्घ काळापर्यंत तुम्हाला साथ देऊ शकतो.
Share your comments