आजकाल पारंपरिक पद्धतीने कोणताच शेतकरी शेती करत नाही. पहिल्या काळी शेतीची मशागत ही बैलाने केली जायची परंतु आता च्या काळात सर्व जण ट्रॅक्टर चा उपयोग करू लागले आहेत.ट्रॅक्टर चा उपयोग तसेच अत्याधुनिक अवजारांचा उपयोग शेतकरी करू लागला आणि कमी वेळात शेतीची भरपूर कामे होऊ लागली. त्यामुळं शेतकरी कमी काळात आणि कमी मेहनत करून जास्त उत्पादन काढू लागला.
शेतकरी वर्गासाठी आवश्यक असणाऱ्या आणि नवीन तंत्रज्ञान प्रणाली विकसित केलेल्या CNG ट्रॅक्टर मुळे कोणते कोणते फायदे शेतकरी वर्गाला होणार आहेत याची सविस्तर माहिती.
नवीन प्रकारच्या यंत्र सामग्री मुळे शेतकरी वर्ग हा सुखी झाला आहे तसेच बैलांच्या कष्टातुन तो पूर्ण पने निवांत झाला आहे.आता ट्रॅक्टर ने शेती करणे सुद्धा खूपच अवघड झाले आहे. पेट्रोल आणि डिझेल चे भाव आभाळपर्यंत गेले आहेत. सध्या चा डिझेल चा दर हा 95 रुपये लिटर एवढा झालेला आहे. त्यामुळं डिझेल वर ट्रॅक्टर चालवणे खूपच अवघड होऊन बसले आहे.आता मार्केट मध्ये अनेक नवनवीन टेक्नॉलॉजी विकसित होत आहेत. आता बरीच वाहने इलेक्ट्रिक आणि गॅस वर तयार होऊ लागली आहेत.
हेही वाचा:महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीनेने 2021 मध्ये विकले 22843 ट्रॅक्टर
आजच्या परिस्थिती मध्ये पेट्रोल आणि डिझेल वर वाहने चालवणे खूपच अवघड झाले आहे. त्यामुळे मार्केट मध्ये आता नवीन CNG वर चालणार ट्रॅक्टर आला आहे.CNG ट्रॅक्टर चा उपयोग केल्या नंतर प्रति वार्षिक शेतकऱ्यांना 2 लाख रुपये एवढा फायदा होणार आहे. सोबतच 2022 पर्यंत शेतकऱ्यांना आपले उत्पादन डबल संख्येने वाढवता येणार आहे.
डिझेल ट्रॅक्टरच्या वापराच्या तुलनेत सीएनजी ट्रॅक्टरचा maintanace खर्च हा खूपच कमी असतो. तसेच प्रदूषणाचे प्रमाण 70 टक्क्यांहून कमी होते.असे अनेक प्रकारचे फायदे शेतकऱ्यांना होणार आहेत.
Share your comments