महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीनेने 2021 मध्ये विकले 22843 ट्रॅक्टर

04 June 2021 08:09 PM By: KJ Maharashtra
महिंद्रा ट्रॅक्टर

महिंद्रा ट्रॅक्टर

भारतातील सगळ्यात मोठी ट्रॅक्टर निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने मे 2021 मधील आपल्या ट्रॅक्टर विक्री आकड्यांची घोषणा केली. महिंद्रा अंड महिंद्रा कंपनीने मे 2021 मध्ये 22843 ट्रॅक्टरची विक्री केली. मागच्या वर्षी मे 2020 मध्ये 24 हजार सतरा ट्रॅक्टर विकले गेले होते, तसेच निर्यात बाजारांमध्ये 1341 ट्रॅक्टर विकले आहेत.

महिंद्रा अँड महिंद्रा च्या फार्मा इक्विपमेंट सेक्टर चे अध्यक्ष हेमंत सिक्का यांनी म्हटले की, आम्ही 2021 च्या मध्ये भारतीय बाजारात 22843 ट्रॅक्टर विकले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की मे महिन्याच्या मध्यावधी ग्रामीण क्षेत्रात कोरोना महामारी मुळे लॉक डाऊन चा सामना करावा लागला. त्याचा प्रभाव डीलरशिप वर झाल्यामुळे ट्रॅक्टर ची विक्री प्रभावित झाली. अजून सुद्धा देशातील बऱ्याच राज्यांमध्ये लॉक डाऊन आणि स्थानिक पातळीवर प्रतिबंध लागू आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून कोविड प्रकरणांमध्ये सुधार होताना दिसत आहे. त्यामुळेशेतीच्या कामामध्ये गतीने सुधार होत असताना भविष्यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचे हेमंत सिक्का यांनी सांगितले.

 

शिक्का यांनी सांगितले की, मागील आठवड्यापासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी आपल्या शेतीची तयारी करणे सुरू केले आहे. रब्बी हंगामातील आलेले चांगले उत्पादन, रेकॉर्ड ब्रेक खरेदी, खाद्य पदार्थांच्या किमती मधील तेजी, बाजार समित्यांचे पूर्वपदावर येत असलेले काम  आणि यावर्षी चांगला मान्सून ची अपेक्षा असल्याने येणाऱ्या सीजन मध्ये जास्त लागवड होऊ शकते. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ट्रॅक्टर इंडस्ट्रीला बाजारात मजबुती येईल अशी अपेक्षा आहे. सिक्का यांनी पुढे सांगितले की, निर्यात बाजारांमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 314 टक्के वाढ होऊन 1341 ट्रॅक्टरविकले आहेत.

 प्रोजेक्ट के-2 सोबत ट्रॅक्टर मॉडेल तयार करण्याची योजना

 महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी चे ट्रॅक्टर ट्रॅक्टर मध्ये k-2 एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. 2026 पर्यंत कंपनी ची योजना आहे की प्रोजेक्ट k 2 37 ट्रॅक्टर मॉडेल तयार करणार आहे.k2 सिरीजचे ट्रॅक्टर वजनाने हलके असून त्या पद्धतीने त्यांना डिझाईन केले गेले आहे. जपान मधील मित्सुबिशी महिंद्रा कृषी मशिनरी आणि भारतातील महिंद्रा रिसर्च व्हॅली या ट्रॅक्टरांचे उत्पादन एकमेकांच्या सहकार्याने करणार आहेत. K2 सिरीजचे ट्रॅक्टर येणाऱ्या तीन चार वर्षात बाजारात उपलब्ध होतील.2023 पर्यंत ट्रॅक्टरांचे पहिली फळी बाजारात उपलब्ध होईल.

 

तसेच प्रवासी आणि कमर्शियल वाहन बाजारामध्ये 23 नवीन उत्पादन बाजारात आणणार आहे. यामध्ये नऊ एस यू व्ही आणि 14 कमर्शियल वाहन यांचा समावेश आहे. यापैकी 6 एस यू व्ही आणि सहा कमर्शियल वाहन हे बॅटरी द्वारे संचालित केले जातील. नेक्स्ट जनरेशन स्कॉर्पिओ आणि एक्स यु व्ही सातशे एसयूव्ही या आर्थिक वर्षात बाजारात येतील अशी आशा आहे

ट्रॅक्टर निर्माता कंपनी Tractor manufacturer company महिंद्रा अँड महिंद्रा Mahindra & Mahindra
English Summary: Mahindra & Mahindra Tractor Company sold 22843 tractors in 2021

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.