न्यू हॉलंडच्या एन एच 3230 ट्रॅक्टरचा २० वा वर्धापन दिन

30 April 2021 09:52 AM By: KJ Maharashtra
न्यू हॉलंड एन एच 3230 ट्रॅक्टर

न्यू हॉलंड एन एच 3230 ट्रॅक्टर

 न्यू हॉलंड अग्रिकल्चर या सी एन एच इंडस्ट्रियलच्या एक ब्रँडणे त्यांच्या लोकप्रिय 3230 ट्रॅक्टर मॉडेलचा विसावा वर्धापन दिन साजरा केला.  या मॉडेलची सुरुवात सन 2001 मध्ये झाली होती त्यानंतर न्यू हॉलंड या कंपनीने विविध व्हेरी अन्ट द्वारे दोन दशकांपासून विविध मॉडेल्स चा वारसा विस्तारला आहे. जर यामध्ये विविध मॉडेलचा विचार केला तर 32 30 एन एक्स, 32 30 टी एक्स, 32 30 टी  एक्स सुपर इत्यादी मॉडेलचा समावेश करता येईल.

न्यू हॉलांड चे पहिले मॉडेल हे 32 30 होते ज्यामध्ये विविध प्रकारचे अनेक लक्षणीय वैशिष्ट्ये एकत्र करण्यात आले होते.जर वैशिष्ट्यांचा विचार केला तर, लिफ्ट ओ मॅटीक,  साईड शिफ्ट को स्टंट मेश ए  एफ डी गिअर बॉक्स,रियल ओईल इमरज्ड मल्टी डिस्क ब्रेक्स, सोफ्टेक क्लच, इकॉनोमी पी टी ओ असे बरेच वैशिष्ट्यांचा समावेश करता येईल. जेव्हा न्यू हॉलांड ने 3230 मॉडेल्सचे उत्पादन सुरू केले तेव्हापासून न्यू हॉलांड ने 75000 हून अधिक युनिट्स विकलेले आहेत.

याबद्दल बोलताना न्यू हॉलांडचे  अग्रिकल्चर  विक्री संचालक कुमार बिमल यांनी सांगितले की,  आमच्या ग्राहकांनी आजवरच्या वर्षांमध्ये 3230 ला दिलेल्या समर्थना बद्दल आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत.या मॉडेल्सच्या निरंतर यशा मधून ग्राहकांनी न्यू हॉलांड ब्रँड वर दाखवलेला विश्वास व्यक्त होतं. 

नवे शोध आणि नवीन शेती तंत्रज्ञानाचा सुयोग्य स्वीकार यांच्याद्वारे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी न्यू हॉलंड ॲग्रीकल्चर वचनबद्ध आहे..

New Holland NH 3230 Tractor NH 3230 Tractor New Holland Tractor Anniversary न्यू हॉलंडच्या एन एच 3230 ट्रॅक्टर न्यू हॉलंड ट्रॅक्टरचा वर्धापन दिन
English Summary: 20th Anniversary of New Holland NH 3230 Tractor

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.