मध्य प्रदेश राज्यांमध्ये सोयाबीन पिकाला काळे सोने असे म्हटले जाते. मध्यप्रदेश मध्ये फार मोठ्या क्षेत्रात सोयाबीन शेती केली जाते. परंतु मागील काही वर्षांपासून सोयाबीन उत्पादनात फार मोठी घट नोंदवली गेली आहे. अशा परिस्थितीशी सामना करण्यासाठी भारतीय सोयाबीन अनुसंधान संस्थानने सोयाबीन ज्ञान नाम नावाचे एक मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. तसे पाहायला गेले तर भारत हा कृषिप्रधान देश आहे.
तरीही काही वर्षांमध्ये शेतकरी हा शेतीपासून दूर जाताना दिसत आहे. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे खर्च आणि कष्टाच्या मानाने पिकांचे उत्पादन अपेक्षेपेक्षा फारच कमी येणे हे महत्वाचे कारण सांगता येईल. या पार्श्वभूमीवर सरकारकडून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट होईल या दिशेने निरंतर प्रयत्न केले जात आहे. परंतु या दिशेने हवे एवढे यश मिळताना दिसत नाही. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने मोबाइल ॲप लाँच केले आहेत त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे हे मोबाईल ॲप
भारत सरकारने मागील दोन-तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना शेतीच्या बाबतीतनवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी वेगळ्या प्रकारचे ॲप लॉन्च केले आहेत. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र मध्ये सोयाबीनची शेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु मागील काही वर्षांपासून सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. या परिस्थितीशी निपटण्यासाठी भारतीय सोयाबीन अनुसंधान संस्थान नेसोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोयाबीन ज्ञान नाम नावाच्या ॲप लॉन्च केले आहे.
या ॲप द्वारे मिळणाऱ्या सुविधा
- सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान आणि पिकांचे नियोजन या बद्दलची माहिती मिळते.
- किड, प्रतिबंध आणि तणप्रतिबंध याबद्दल माहिती मिळते.
- तसेच सोयाबीनचे आरोग्यासाठी असलेला आणि त्याचा घरगुती उपयोग त्याबद्दल पण खूप माहिती मिळते.
- तसेच कृषी यंत्र त्यांची वैशिष्ट्ये आणि त्यांची विक्री केंद्र याबद्दल माहिती मिळते.
या ॲपला कसे डाऊनलोड करावे?
सध्या हे ॲप फक्त हिंदी भाषेत उपलब्ध आहे. शेतकरी आपल्या मोबाईल मधून गुगल प्ले स्टोर मध्ये जाऊन डाऊनलोड करू शकता व या ॲप च्या माध्यमातून सोयाबीन शेती विषयी सगळी माहिती प्राप्त करू शकतात.यामध्ये एक त्वरित महत्वपूर्ण माहितीसाठी एक पर्याय उपलब्ध आहे. या पर्यायाच्या माध्यमातून सोयाबीन शेती संबंधित सगळ्या प्रकारची माहिती पटकन मिळते. ज्यामध्ये शेताच्या मशागती पासून तर कापणी पर्यंत ची माहिती तसेच पिकांची व्यवस्थापन कसे करावे या बाबतीतली इत्थंभूत माहिती या मध्ये उपलब्ध आहे. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होऊ शकते.
Share your comments