
Resignation Disley Guruji rejected
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्याबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असलेले रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांचा राजीनामा आता नामंजूर करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामुळे आता याची चर्चा सुरू आहे.
रणजितसिंह डिसले यांनी ४ दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. यामुळे यानंतर काहीतरी घडेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या त्रासाबद्दल अनेकदा भाष्य केले होते.
यामुळे ते कायम चर्चेत होते, दरम्यान काही कारवाई होणार नाही, राजीनामा मागे घ्या, असे सांगून तुमच्यावर अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. अखेर त्यांचा राजीनामा नामंजूर झाल्याने आता चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्यावर ३४ महिने कामावर गैरहजर राहूनही पगार घेत असल्याचे कारण देत सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
एक नंबर! अवघ्या २९९ रुपयांत तब्बल १० लाखांचा विमा, वाचा सविस्तर..
याला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला होता. यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. डिसले यांना पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेतील फुल ब्राईट संस्थेने शिष्यवृत्ती मंजूर केली होती. त्यामुळे त्यांना अभ्यासासाठी अमेरिकेत जायचे होते. त्यासाठी रजा मिळावी म्हणून त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र रजा मिळाली नाही आणि हा वाद वाढत गेला.
महत्वाच्या बातम्या;
मोठी बातमी! अनेक राजकीय घडामोडींनंतर दिनेश गुणवर्धने बनले श्रीलंकेचे पंतप्रधान
ब्रेकिंग! प्रसिध्द बांधकाम व्यावयसायिक डी. एस. कुलकर्णी यांना जामीन मंजूर
दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा, एकमेकांवर बॉम्ब फेकले, राजकीय वातावरण तापले..
Share your comments