1. बातम्या

घोकंपट्टी पासून विद्यार्थ्यांची सुटका! नव्या शिक्षण पद्धतीत आता मोठ्या प्रमाणात बदल होणार

शैक्षणिक क्षेत्राबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मागील कित्येक दशकांपासून चालत आलेल्या शिक्षण पद्धतीत आता आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. त्यासाठी मोदी सरकार कडून गेल्या काही दिवसांपासून नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यात येत होते. लवकरच या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले जात आहेत.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
New Education Policy

New Education Policy

शैक्षणिक क्षेत्राबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मागील कित्येक दशकांपासून चालत आलेल्या शिक्षण पद्धतीत आता आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. त्यासाठी मोदी सरकार कडून गेल्या काही दिवसांपासून नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यात येत होते. लवकरच या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले जात आहेत.

भारतीय शिक्षण पद्धतीत 10+2 असे धोरण गेल्या अनेक दशकापासून चालले होते. पालकांकडूनही दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांना अनन्यसाधारण असे महत्त्व दिले जात होते. मात्र आता नवीन शैक्षणिक धोरणात या पद्धतीत मोठे बदल केले जाणार आहेत. त्यानुसार 5+3+4 असे टप्पे केले जाणार असल्याचे समजते. नव्या धोरणानुसार पहिली ते पाचवी सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी असे टप्पे असतील. याची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून (2022-2023) केली जाणार असल्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने सरकारी गैरसरकारी पातळीवर जोरदार तयारी होत असल्याचे समजत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाविषयी गेल्या दोन वर्षापासून शैक्षणिक वर्तुळात चर्चा होत होती. नव्या शैक्षणिक धोरणातील बदलांवर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वेगवेगळी मते मांडली जात होती. या धोरणातील चांगल्या बाबी तसेच कोणत्या गोष्टीवर बदल करण्याची गरज आहे या विषयी माहिती मागवण्यात आली होती. आता ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच या शैक्षणिक धोरणाचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे.

पायाभूत प्राथमिक,माध्यमिक व उच्चमाध्यमिक वर्ग याप्रमाणे हे टप्पे केले जाणार आहेत. त्यातील शालेय जीवनातील नववी ते बारावी चा टप्पा अतीमहत्त्वाचा ठरणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता बारावीपर्यंत चा टप्पा हा शालेय शिक्षणाचा एक भाग असेल.

नव्या धोरणातील महत्त्वाच्या बाबी

»शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर या पद्धतीला चाप बसणार आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार, समस्याचे निराकारण, सहकार्य,डिजिटल शिक्षण आदी विषयांचा समावेश असेल.

»शिक्षकांचं पालकांना देखील जागरूक करण्यावर भर दिला जाणार आहे.

» प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेला प्रोत्साहन देण्यास प्राथमिकता दिली जाईल.

» वैचारिक आकलनावर भर दिला जाईल, सर्जनशीलता व समलोचनात्मक विचारसरणीला पुढे केले जाईल.

» विद्यार्थ्यांसाठी कला व विज्ञान यांच्यात वेगळेपणा अडचण येणार नाही. नीतिमत्ता व घटनात्मक मुल्य अभ्यासक्रमाचा प्रमुख भाग असेल. संगीत, कला, तत्वज्ञान, नृत्य, न्याय इत्यादी बाबींचा नव्या अभ्यासक्रमात समावेश असेल. बॅचलर पदवी तीन ते चार वर्षाची असेल.

» 2050 पर्यंत किमान 50 टक्के विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण यात भाग घ्यावा लागेल.

English Summary: New education policy Published on: 22 January 2022, 03:28 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters