राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गेल्या आठवड्यामध्ये राज्यातील तरुणांसाठी एक खुशखबर दिली आहे ती म्हणजे राज्यात सात हजार 231 पोलिसांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अशा आशयाची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत बोलताना दिली होती.
या भरतीमध्ये ज्या तरुणांनी एनसीसी चे प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र मिळवले आहे अशांना पोलीस भरती मध्ये विशेष संधी मिळणारआहे.त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
NCC प्रमाण धारकांसाठी पोलीस भरतीत विशेष संधी….
ज्या तरुणांनी एनसीसी प्रशिक्षण पूर्ण केले आहे अशांसाठी एक आशेचा किरण निर्माण झाला आहे.तो म्हणजे होऊ घातलेल्या पोलीस भरती मध्ये एनसीसी प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र धारण केलेल्या उमेदवारांना एनसीसी प्रमाणपत्राचे गुण या भरतीत ग्राह्य धरली जाणार आहेत. होऊ घातलेल्या या पोलिस भरतीमध्ये एनसीसीचे प्रमाण पत्र असलेल्या तरुणांना वाढीव गुणांचा फायदा मिळणार आहे. अशा आशयाची माहिती क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिली. आपल्याला माहित आहेच कि एनसीसी प्रमाणपत्र प्राप्त तरुणांना लष्कर भरती मध्ये देखील प्राधान्यक्रम दिला जातो. याच आशयाचा निर्णय आता राज्य सरकारने घेतला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी की, ज्या एनसीसी कॅडेट्स कडेएनसीसीचे सी सर्टिफिकेट असेल अशा तरुणांना 5 टक्के मार्क,बी सर्टिफिकेट असलेल्या तरुणांना तीन टक्के मार्क आणि ज्या कॅडेट्स कडे ए सर्टिफिकेट आहे त्यांना दोन टक्के अतिरिक्त गुण पोलीस भरतीसाठी दिले जाणार आहे. आता भरती च्या बाबतीत बदललेल्या नियमानुसार लेखी परीक्षा प्रथम आणि नंतर फिजिकल टेस्ट होणार आहे. या दोन्ही परीक्षा मिळून 200 गुण असणार आहेत. यापैकी नॅशनल कॅडेट कोर अर्थात एनसीसी प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राच्या श्रेणीनुसार बोनस गुण दिले जाणार आहेत.
नक्की वाचा:स्कूटी मधील सुपर्ब होंडा ॲक्टिवा होणार आता इलेक्ट्रिक स्कूटर,अशी असतील वैशिष्ट्ये
महाराष्ट्रातील एनसीसी चे कार्यरत विभाग
महाराष्ट्रात कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे एनसीसी चे विविध विभाग कार्यरत आहेत. यामध्ये पाच महाराष्ट्र, सहा महाराष्ट्र, छप्पन महाराष्ट्र कोल्हापूर, सोळा महाराष्ट्र सांगली, 19 महाराष्ट्र कराड, 22 महाराष्ट्र सातारा, सैनिकी स्कूल सातारा, 58 महाराष्ट्र सिंधुदुर्ग व दोन महाराष्ट्र नेव्हल एनसीसी रत्नागिरी यांचा समावेश आहे.
Share your comments