1. बातम्या

मोबाईल जिनिंगची संकल्पना ठरेल शेतकऱ्यांसाठी फायदेशीर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा अनोखा उपक्रम

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून कापसाचे मूल्यवर्धन करता यावे यासाठी एका यंत्राची निर्मिती करण्याचे कार्य सुरू आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
cotton

cotton

 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून कापसाचे मूल्यवर्धन करता यावे यासाठी एका यंत्राची निर्मिती करण्याचे कार्य सुरू आहे.

 या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे आता कापसाच्या वेचणी नंतर थेट शेताच्या बांधावर कापसाचे मूल्यवर्धन करता येणार आहे. ही प्रक्रिया जिनिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावरच पूर्ण होणार असल्याने कापसातील सरकी आणि रुई ही शेतकऱ्यांसमोर वेगळी केली जाणार आहे. कारण रुईच्या टक्केवारी वरच कापसाचे भाव ठरत असतात म्हणून शेतकऱ्यां समोर कापसाचे रुई वेगळी करता आल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाचे मूल्यमापन करता येणार आहे.

 ही  मोबाईल जिनिंगचीसंकल्पना महात्मा फुले कृषी विद्यापीठाने मांडलेली आहे. यावर कृषी विद्यापीठाचे काम सुरू असून त्याचे डिझाइन व यंत्राचे काम पूर्ण झाले असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे ट्रॅक्‍टरचलित असल्याने शेतकऱ्यांना परवडू शकेल असे किंमतीमध्ये ते बाजारात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कापसावर आता शेतीच्या बांधावरच प्रक्रिया केली जाणार आहे.यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे.समजा कापसामध्ये एक टक्का जरी रुई चे प्रमाण वाढले तरी 170 रुपये शेतकऱ्यांना जास्त मिळणार आहे.जर कापसाच्या भावाबाबत इतर देशांचा विचार केला तर रुईच्या गाठी करून विक्री केली जाते.

परंतु भारतामध्ये कापसाला हमीभाव देऊन त्यानुसार विक्री केली  जाते. जर येणाऱ्या काळामध्ये रुईच्या प्रमाणानुसार जर कापसाचे दर ठरविण्याचे धोरण ठरले तर याचा खूपच फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

English Summary: mobile jining concept is can useful and benificial to farmer Published on: 27 February 2022, 02:25 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters