संपूर्ण देशभरात नावाजलेले ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांनी शिक्षकपदाचा राजीनामा प्राथमिक शिक्षण विभागाकडे सोपविला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अजून कारण समोर आले नाही. त्यांनी ७ जुलैला त्यांनी राजीनामा दिला असून तो गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडेही आला आहे.
दरम्यान, क्युआर कोड शिक्षण प्रणाली विकसीत केल्यामुळे ते चर्चेत आले होते. रणजितसिंह डिसले यांना दोन वर्षांपूर्वी ग्लोबल टिचर पुरस्कार मिळाला. आता शिक्षण विभाग आणि डिसले गुरुजींमध्ये यांच्यात कलगीतुरा निर्माण झाला आहे. याची देखील राज्यभरात चर्चा रंगली होती. त्यांना रजा देखील लवकर मंजूर होत नव्हती.
या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. पण, राजीनामा मागे घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असते. त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र शिक्षण क्षेत्रात हा मोठा धक्का आहे.
धक्कादायक! मगरीने आठ वर्षांच्या मुलाला गिळले, पोटात मुलगा जिवंत असेल म्हणून..
त्यांनी अमेरिकेत फेलोशिपला जाण्यासाठी रजा मागितली होती. पण पूर्ण कागदपत्र नसल्याने त्यांचा अर्ज तसाच प्रलंबित ठेवला होता. मात्र वाद वाढत गेल्याने तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत पोहचला आणि त्यांच्या आदेशाने डिसले गुरुजींना रजा मिळाली. तसेच शिक्षण विभागातील काहींनी माझ्याकडे पैसे मागितले, असा आरोपही त्यांनी केला होता. असे असताना नंतर मात्र त्यांनी माफीनामा दिला होता.
महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कमही आणि अतिवृष्टी झाल्यास अनुदानही, शेतकऱ्यांना सुखद धक्का
काय सांगता! लग्नानंतर रोज साडीच नेसावी लागणार, नवरीकडून त्याने कॉन्ट्रॅक्टवर सहीच घेतली
'स्वाभिमानी मिळवून देणार शेतकऱ्यांना ५० हजार, पूर असेल तर पोहत येऊन मोर्चात सहभागी व्हा'
Share your comments