1. बातम्या

आता सहज समजेल सात बारा; उताऱ्यात येणार क्युआर कोड

बँकेत कर्ज प्रकरण करण्यावेळी किंवा इतर जमिनीचे व्यवहार करताना सातबारा हे शब्द आपल्या कानावर नेहमी पडत असतात. सात बारा हा जमिनीची निगडित शब्द आहे. पण सात बारा प्रत्येकांना समजतो असे नाही.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


बँकेत कर्ज प्रकरण करण्यावेळी किंवा इतर जमिनीचे व्यवहार करताना सातबारा हे शब्द आपल्या कानावर नेहमी पडत असतात. सात बारा हा जमिनीची निगडित शब्द आहे.  पण सात बारा प्रत्येकांना समजतो असे नाही. यामुळे सरकारने सात बारा सोपा करण्याचा विचार केला आहे. यासाठी सात बारा उताऱ्यात बदल केला जाणार आहे. यात जवळजवळ ११ विविध प्रकारचे बदल करण्यात येणार आहेत.

तत्पुर्वी आपण सात बारा काय याचा अर्थ जाणून घेणार आहोत.  सातबारा म्हणजे जमीन का शेत काय असतो याचा अर्थ. आज आपण या शब्दाचा अर्थ जाणून घेणार आहोत. तलाठ्याकडे जमिनी संदर्भातील रेकॉर्ड असते त्यात कमीत कमी शब्दात व विशिष्ट मांडणीत असलेला तपशील म्हणजे सातबारा होय. जमिनीची माहिती यामध्ये दिलेली असते त्याला गाव नमुना असे म्हणतात.  गाव नमुना ठेवण्यासाठी 1-21 अशी विभागणी असते. त्यातील 7 नंबरचा नमुना हा मालकी हक्काबाबत असतो तर 12 नंबर मध्ये पिकांबाबत माहिती दिलेली असते. या दोन्ही प्रकारच्या माहितीचे एकत्रीकरण हे सातबारामध्ये केलेले असते. जमिनीचे सातबारा आणि त्याचे योग्य नियोजन आणि नोंद ठेवण्याचे काम तलाठीकडे असते.

दरम्यान  सात बाऱ्यात ५० वर्षानंतर बदल करण्यात आला आहे. हा उतारा सर्वांना समजेल अशा भाषेत येणार असून त्यावर क्युआर कोडही असणार आहे. महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा बदल करण्याचा निर्णय घेणात आला.

7 -12 च्या संबंधित महत्त्वाच्या बाबी

  1. सातबारा उतारा हा जमीन मालकी हक्काचा प्राथमिक व अंतरिम पुरावा असतो.
  2. सातबारा उतारा हा जोपर्यंत बेकायदेशीर आहे असे ठरवले जाते तोपर्यंत तो कायदेशीर मानला जातो.
  3. सातबारामध्ये पीक पाहणी नोंद केलेली असते ते दरवर्षी केली जाते.
  4.  जमिनीचे गटनंबर असतात त्या प्रत्येक गटासाठी एकच सातबारा असतो.
  5.  मालकाशिवाय दुसऱ्या व्यक्तीचे नाव, कुळ, खंड इत्यादींची नावे सातबारा उतारामधील लावण्याचा अधिकार तलाठी यांना नाही.
  6. सातबारा उतारा असलेल्या नोंदींचे पुस्तके दर दहा वर्षांनी लिहिली जातात.
  7.   गाव नमुना 12 हा पिकांसंबंधी आहे. गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदी घेताना हंगाम व पिकांच्या नोंद घेणे अभिप्रेत असते.
  8. गाव नमुना नंबर असलेल्या रकान्यात पिकांच्या नोंदी लिहाव्यात व त्या खालील क्षेत्र  लिहावे.

English Summary: Now easily understand 7/12 utara , now QR code will also on utara Published on: 04 September 2020, 02:02 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters