TVS मोटरसायकल कंपनी ने आपल्या लोकप्रिय स्कूटर ज्युपिटर चे नवीन प्रकार लॉन्च केले आहेत. याचे नाव ज्युपिटर क्लासिक आहे आणि ही नवीन टॉप-स्पेक मॉडेल आहे. TVS Jupiter Classic या स्कुटर ची एक्स-शोरूम किंमत 85,866 रुपये अशी आहे. जे की पाच लाख वाहने रस्त्यावर चालवल्याचा आनंद साजरा करण्यासाठी TVS ने ज्युपिटर क्लासिक लॉन्च केला आहे.
नवीन काय आहे :-
ज्युपिटर क्लासिक या नवीन मॉडेल मध्ये काही कॉस्मेटिक बदल केले आहेत. कॉस्मेटिक बदलांमध्ये फेंडर गार्निश, 3D लोगो आणि मिरर हायलाइटसाठी ब्लॅक थीम वापरली आहे. जे की या नवीन मॉडेल ला नवीन व्हिझर आणि हँडलबार देखील मिळतात. जे की या क्लासिक ला डायमंड-कट अलॉय व्हील्स तसेच आतील पॅनल्स गडद राखाडी रंगाचे भेटतात. सीट्स आता प्रीमियम स्यूडे लेदरेटच्या बनलेल्या आहेत आणि मागील सीटला बॅकरेस्ट देखील दिलेले आहे.
हेही वाचा:-पीकविमा कंपन्यांनी आदेश नाकारले असल्याने शेतकऱ्यांचा पीकविमा कंपणीविरुद्ध आंदोलन जाहीर
इंजिन व रंगाचा पर्याय :-
स्कुटरमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केले गेले नाहीत. जे की 109.7 cc, सिंगल-सिलेंडर इंधन इंजेक्शन इंजिन मिळवते. जे की हे इंजिन 7.47 PS ची कमाल पॉवर व 8.4 Nm चा टोर्क तयार करत आहे. एवढेच नाही तर डेकल्स आणि डायल सुद्धा अपडेट केले आहे व ज्युपिटर क्लासिक दोन रंगामध्ये उपलब्ध असणार आहे त्यामध्ये मिस्टिक ग्रे आणि रीगल पर्पल.
फीचर्स :-
फीचर्स बोलायचे तर, एक सर्व-इन-वन लॉक, इंजिन किल स्विच भेटत आहे. एवढेच नाही तर मोबाईल चार्जे करण्यासाठी USB port देखील दिले आहे. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर स्कूटर इको मोडमध्ये किंवा पॉवर मोडमध्ये चालत आहे की नाही हे देखील तिथे दाखवले जाते. ज्युपिटर क्लासिकला एलईडी हेडलॅम्प तसेच साइड स्टँड इंडिकेटर व इलेक्ट्रिक स्टार्टर, पेट्रोल कमी असेल तर अलर्ट, फ्रंट युटिलिटी बॉक्स व 21 लीटर बूट स्पेस तसेच रिट्रॅक्टेबल हुक बॅग आणि बाह्य इंधन फिलर मिळते.
Share your comments