1. ऑटोमोबाईल

Bike News: 'Vida' आहे हीरो मोटोकॉर्पची पहिली ई स्कूटर, एका चार्जवर धावणार 165 किमी

सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आकडे फार मोठ्या प्रमाणावर ग्राहक वळत असून अनेक दुचाकी तयार करणाऱ्या कंपन्या इलेक्ट्रिक दुचाक्या तयार करत आहेत. स्पर्धेमध्ये हीरो मोटोकॉर्प दुचाकी निर्मिती कंपनी देखील मागे नसून या कंपनीने नुकताच त्यांचा EV ब्रँड विडा अंतर्गत पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली असूनही स्कूटर Vida V1 Pro आणि V1 प्लस या दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. लेखामध्ये आपण या ई स्कूटरचे वैशिष्ट्याने किंमत जाणून घेऊ.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
hero vida v1 ev

hero vida v1 ev

सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आकडे फार मोठ्या प्रमाणावर ग्राहक वळत असून अनेक दुचाकी तयार करणाऱ्या कंपन्या इलेक्ट्रिक दुचाक्या तयार करत आहेत. स्पर्धेमध्ये हीरो मोटोकॉर्प दुचाकी निर्मिती कंपनी देखील मागे नसून या कंपनीने नुकताच त्यांचा EV ब्रँड विडा अंतर्गत पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली असूनही स्कूटर Vida V1 Pro आणि V1 प्लस या दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. लेखामध्ये आपण या ई स्कूटरचे वैशिष्ट्याने किंमत जाणून घेऊ.

नक्की वाचा:Komaki ने भारतात लाँच केली हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किती आहे किंमत

 व्ही 1 प्रो आणि व्ही 1 प्लसचे वैशिष्ट्ये

 या दोन्ही बाईकचा टॉप स्पीड 80 Kmph असेल तसेच जलद चार्जिंग 1.2 किमी/ मिनिट असेल. व्ही 1 प्रोचा वेग 0-40 किमी पर्यंत 3.2 सेकंदात आणि व्ही 1 प्लस 3.4 सेकंदात पोहोचेल. एका चार्जर व्ही 1 प्रो 165 किमी धावेल आणि प्लसला 143 किमीची रेंज मिळेल.

दोन्हींमध्ये 7 इंचाचा टच स्क्रीन असून एकाधिक रायडिंग मोड देखील मिळतील. यासोबतच यामध्ये कीलेस कंट्रोल आणि एसओएस अलर्ट सारखे फिचर देण्यात आले आहेत. तसेच ज्या स्कूटरमध्ये स्वॅप करण्यायोग्य बॅटरी तंत्रज्ञान आणि एकापेक्षा जास्त चार्जिंगचा देखील पर्यायांमध्ये असणार आहे.

नक्की वाचा:भारतात लवकरच लॉन्च होणार मोठ्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Vida स्कूटर दोन रेंज मध्ये उपलब्ध

 व्हिडा v1 स्कूटर  Vida V1 प्लस आणि Vida V1 प्रो या दोन रेंज आणि परफॉर्मन्स मध्ये सादर केली जाणार आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे सरकारचे  FAME-ll अनुदान दोन्ही स्कूटरवर उपलब्ध असेल.

या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना ईव्ही खरेदीच्या वेळी मोठी सूट दिली जाते. कंपनीचे हे मॉडेल जयपूर येथील  R&D केंद्रात डिझाईन आणि विकसित करण्यात आले असून हिरोने ही इलेक्ट्रिक स्कूटर विकसित करण्यासाठी पंचवीस हजार तास घेतले आहेत.

किती आहे या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत?

 यामध्ये Vida V1 प्लसची एक शोरूम किंमत एक लाख 45 हजार रुपये असून प्रोची किंमत एक लाख 59 हजार रुपये आहे.

नक्की वाचा:Car News: अरे वा! 'या' आहेत जबरदस्त वैशिष्ट्य असलेल्या 3 एसयूव्ही कार, 1 लिटर पेट्रोलमध्ये धावतील 28 किमी

English Summary: hero motocorp launch first electric bike vida with many attractive feature Published on: 15 October 2022, 08:16 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters