शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून चांगले उत्पादन घेत असतात. एवढेच नाही तर आपल्या कल्पनेने काहीतरी भन्नाट बनवत असतात. असाच एक शेतकरी (farmers) चर्चेत आला आहे. ज्याने आपल्या भन्नाट कल्पनेने स्वयंचलित हायड्रोजनिक कार बनवली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी पुत्र हर्षल नक्षणे यांनी आपल्या भन्नाट कल्पनेतून स्वयंचलित हायड्रोजनिक कार (The hydrogen car) बनवली आहे. जी फक्त 150 रुपयात 250 किलो मीटरपर्यंत प्रवास करता येणार आहे.
सध्या पेट्रोल व डिजेलचे (petrol diesel price) दर 120 रुपयावर पोहचले आहेत. सर्वसामान्य लोकांना परवडेना झालेत. या कारणाने यवतमाळमधील वणी येथील हर्षल नक्षणे नावाच्या युवकाने आपल्या कुणाल आसुटकर नावाच्या मित्राच्या मदतीने अफलातून अशी प्रदुषण मुक्त स्वयंचित 'सोनिक कार' तयार केली आहे.
पीक काढणीसाठी सर्वात स्वस्त मशीन लॉन्च; शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ वाचणार
हर्षल नक्षणे याने एम टेक पर्यंत शिक्षण घेतले आहे. या युवकाचे एक स्वप्न होते की, भारताकडे स्वत:ची कार धावण्यासाठी सक्षम असली पाहिजे. परवडणाऱ्या किमतीत ग्रीन हायड्रोजन ऊर्जा वापरणे आणि अपघात आणि मानवी चुका कमी होईल अशी कार हवी. त्या दृष्टीकोणातून हर्षल नक्षणे या शेतकऱ्याने एक नावाने कंपनी रजिस्टर केली आहे.
शेतमाल तारण कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; शेतमालावर 75 टक्यांपर्यंत कर्ज उपलब्ध
गेल्या काही दिवसापूर्वीच ही कार तयार झाली आहे. हायट्रोजन गॅसवर (Hydrogen gas) चालविणारी ही कार आहे. सेल्फ ड्रायव्हींगसाठी संगणक तयार केले आहे. एक लिटर हायट्रोजनमध्ये 250 किलो मिटर ही कार धावणार आहे. त्यामुळे पेट्रोल व डिजेलवर चालणा-या वाहना पासून सुटका होणार आहे.
फक्त कारसाठी लागणारे काच व टायर ह्या वस्तू अहमदाबाद येथून खरेदी करण्यात आले. प्रायोगिक तत्वावर ही कार तयार कली असून, त्यासाठी त्याला तब्बल 25 लाख रुपये खर्च आला आहे.
महत्वाच्या बातम्या
भाजीपाला पिकांमधील किटकरोगांचा कायमचा करा नायनाट; जाणून घ्या नियोजन पद्धती
LIC च्या जीवन शिरोमणी योजनेत फक्त 4 वर्षांसाठी गुंतवणूक करा आणि मिळवा 1 कोटी रुपयांचा लाभ
चांगल्या आरोग्यासाठी तुळशीच्या बिया उत्तम; अनेक आजारांपासून करतात बचाव, जाणून घ्या...
Share your comments