1. कृषी व्यवसाय

भाजीपाला पिकांमधील किटकरोगांचा कायमचा करा नायनाट; जाणून घ्या नियोजन पद्धती

यावर्षी खरीप हंगामातील पिकांना सततच्या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. विशेषता भाजीपाला पिकांमध्ये वेगवेगळ्या कीड-रोगांचा प्रादूर्भाव निर्माण झालेला पाहायला मिळाला. या कारणाने शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट देखील झाली.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
crops planning methods

crops planning methods

यावर्षी खरीप हंगामातील पिकांना सततच्या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. विशेषता भाजीपाला पिकांमध्ये वेगवेगळ्या कीड-रोगांचा प्रादूर्भाव (Prevalence of pests and diseases) निर्माण झालेला पाहायला मिळाला. या कारणाने शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट देखील झाली.

त्यामुळे भाजीपाला पिकांमधील किटकरोगांचे व्यवस्थापन कसे करावे? याची माहिती आज आपण जाणून घेऊया. भाजीपाला पिकातही कीटकरोग आढळल्यास ४.० मिली क्‍लोरपायरीफन्स २० ईसी १ लिटर पाण्यात विरघळवून सिंचनाच्या पाण्यात मिसळा.

दिलासादायक! 'या' बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय सर्वाधिक बाजारभाव; जाणून घ्या दर

भाजीपाला पिकावर पांढरी माशी किंवा शोषक किडीचा प्रादुर्भाव (Insect infestation) होण्याची शक्यता अधिक असते. हे टाळण्यासाठी आकाश निरभ्र असताना १.० मिली इमिडाक्‍लोफिड ३ लिटर पाण्यात मिसळून फवारा.

शेतकरी शेतीमध्ये प्रकाश साफळा देखील बसवू शकतात. यासाठी कमी किमतीचा प्रकाश सापळा बसवण्यासाठी प्लास्टिकच्या टबमध्ये किंवा मोठ्या भांड्यात कीटकनाशकाचे द्रावण मिसळा.

पीक काढणीसाठी सर्वात स्वस्त मशीन लॉन्च; शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ वाचणार

यानंतर टबवर एक स्टँड (stand) तयार करा आणि बल्ब लावा आणि शेताच्या मध्यभागी ठेवा. या प्रक्रियेनंतर पिकांचे नुकसान करणारे हानिकारक कीटक प्रकाशाने आकर्षित होतील आणि यानंतर टबमध्ये पडतील आणि त्याठिकाणी नष्ट होतील. यानुसार तुम्ही किटकांचे नियंत्रण करून उत्पादनात वाढ करू शकता.

महत्वाच्या बातम्या 
LIC च्या जीवन शिरोमणी योजनेत फक्त 4 वर्षांसाठी गुंतवणूक करा आणि मिळवा 1 कोटी रुपयांचा लाभ
चांगल्या आरोग्यासाठी तुळशीच्या बिया उत्तम; अनेक आजारांपासून करतात बचाव, जाणून घ्या...
शेतमाल तारण कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; शेतमालावर 75 टक्यांपर्यंत कर्ज उपलब्ध

English Summary: Permanent eradication pests vegetable crops planning methods Published on: 02 October 2022, 04:50 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters