1. बातम्या

दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांवर संकट ! दुभत्या जनावरांचे भाव ३० टक्क्यांनी घसरले

दुभत्या जनावरांचे भाव ३० टक्क्यांनी घसरले

दुभत्या जनावरांचे भाव ३० टक्क्यांनी घसरले

कोरोनामुळे गेल्या दीड महिन्यापासून आठवडे बाजार बंद आहेत. तसेच दुधाचे दर प्रति लिटरमागे तब्बल दहा ते अकरा रुपयांनी पाडल्याने दुभत्या जनावरांच्या किमतीवर परिणाम झाला आहे. बाजार बंद असले तरी शेतकऱ्यांत समन्वयाने होणाऱ्या खरेदी- विक्रीच्या व्यवहारात ३० ते ३५ टक्के दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पावसाळ्याच्या आधी शेतकरी शेत मशागतीसाठी बैलासह दुभत्या माई-म्हशींची खरेदी - विक्री करत असतात. मागील काळातील दुष्काळी स्थिती, चाऱ्या पाण्याच्या गंभीर प्रश्नामुळे जनावरे सांभाळताना कसरत करावी लागली त्यामुळे पशुधनाची संख्या कमी झाली.अनेक शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय मोडीत काढले. मात्र अलीकडच्या काळात नैसर्गिक स्थिती चांगली असल्याने शेतकरी पुन्हा दूध व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. त्याचा परिणाम म्हणून दुभत्या जनावरांच्या दरात वाढ झाली.

 

मात्र आता पुन्हा गेल्या वर्षभरापासून दूध व्यवसाय अडचणीत आहे. कोरोना संसर्गाची वाढ होऊ लागल्याने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दुधाला मागणी नसल्याचे सांगत दूध संघांनी दुधाचे प्रति लिटरमागे सुमारे १० ते ११ रुपयांनी कमी केली. याउलट दूध व्यवसाय अडचणीत असलेल्या काळात पशुखाद्याचे दर मात्र वाढले. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्याचा परिणाम दुभत्या जनावरांच्या दरावर झाल्याचे दिसत आहे. साधरण एक लाख रुपयांपर्यंत मिळणारी दुभती म्हैस आता ७० हजारांपर्यंत विकली जात आहे. ७० ते ८० हजारांपर्यंत विकली दाणारी दुभती गाय ४५ ते ५० हजाराला मिळत आहे.

 

कोरोना काळात गर्दी होऊ नये म्हणून आठवडे बाजार बंद असल्याने जनावरांची खरेदी-विक्री बंद आहे. मात्र शेतकरी पातळीवर अंतर्गत होत असलेल्या व्यवहारातून ही बाब स्पष्ट बाब होत आहे. बाजार सुरू झाल्यानंतर जनावरांचे दर घसरल्याची बाब पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

खरिपाच्या तोंडावर दरवर्षी बेल, दुभती, जनावरे यांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत असते. मात्र कोरोनामुळे नगर जिल्ह्यातील जनावरांसाठी प्रसिद्घ असलेल्या लोणी, काष्टी, घोडेगावचे बाजार बंद असल्याने जनावरे, बैल, दुभत्या जनावरांची खरेदी- विक्री बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षी अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters