शेतीला जोडधंदा म्हणून बरेच शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात. कारण या माध्यमातून दुधाच्या उत्पादनातुन चांगली आर्थिक प्राप्ती शेतकऱ्यांना होत असते. परंतु सध्याच्या परिस्थितीत गाई आणि म्हशीच्या किमती पाहिल्या तर लहान शेतकऱ्यांना खरेदी करणे शक्य नाही. परंतु अशा शेतकऱ्यांना सरकारच्या आर्थिक मदतीने गाई व म्हशी खरेदी करता येतात.
कारण नवीन पशुपालकांना बँकेकडून अगदी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. परंतु बऱ्याचदा आपल्याला ही प्रोसेस माहीत नसते, म्हणून या लेखात आपण गाय व म्हशी पालनासाठी कर्ज घेण्याची प्रक्रिया कशी आहे याची संपूर्ण माहिती घेऊ.
गाई आणि म्हशीसाठी किती कर्ज उपलब्ध असते?
जर तुम्हाला यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही पशुसंवर्धन योजना अंतर्गत पशु किसान क्रेडिट कार्ड योजनासारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून राबवण्यात आले आहेत. या माध्यमातून तुम्हाला एक लाख 60 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणे शक्य आहे.
नक्की वाचा:Fantastic Bussiness:'या' व्यवसायात आहेत चांगल्या संधी,वाचा माहिती आणि करा सुरुवात
इतकेच नाही तर पशुसंवर्धन कर्ज योजनेच्या माध्यमातून, तुम्ही गाय आणि म्हैसच नाही तर इतर जनावरांच्या खरेदीसाठी देखील कर्ज मिळवू शकता जसे की मेंढीपालन, शेळीपालन आणि कुक्कुटपालन इत्यादी.
यामध्ये तुम्हाला जे कर्ज दिले जाते ते जनावरांच्या किमतीनुसार असते व यावर फार कमी व्याजदर भरावा लागतो.उदाहरणच द्यायचे झाले तर म्हशीसाठी कर्ज घेतले तर तुम्हाला 60 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणे शक्य आहे. जर तुम्हाला एका गाईवर कर्ज घ्यायचे असेल तर 40 हजार रुपयांपर्यंत आणि दोन गायीवर 80 हजार रुपयांचे कर्ज मिळते.
गाय आणि म्हशीच्या कर्जासाठी कुणाला अर्ज करता येतो?
1- भारतातील कोणताही नागरिक पशुसंवर्धन योजना अंतर्गत कर्ज घेऊ शकतो.
2- तुम्ही कर्जासाठी अर्ज केल्यानंतर बँकेकडून मंजुरी मिळते व त्यानंतर तुम्हाला पशुसंवर्धन कर्ज दिले जाते.
3-याशिवाय अर्जदारांनी काही अटी पूर्ण करणे देखील गरजेचे आहे.
या कर्जासाठी लागणारी कागदपत्रे
बँक पासबुकचा फोटो,आधार कार्ड,पासपोर्ट आकाराचे फोटो, गुरे राखण्यासाठी व चारण्यासाठी जमिनीची प्रत इत्यादी, उत्पन्नाचा दाखला, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पत्याचा पुरावा इत्यादी.
गाय म्हशी पालनासाठी 'या' बँका देतात कर्ज
जर यामध्ये कर्ज देणाऱ्या बँकाबद्दल विचार केला तर यामध्ये व्यावसायिक बँका, राज्य सहकारी बँका, ग्रामीण प्रादेशिक बँका, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक तसेच खासगी बँकांच्या देखील समावेश आहे.
यासाठी अर्ज करण्याची पद्धत
1- त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करावा लागतो.
2- त्यानंतर तो अर्ज भरून त्यामध्ये तुमची सगळी माहिती व्यवस्थित करून बँकेत जमा करायचे आहे.
3- त्यानंतर तुम्हाला केवायसी करावे लागते त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड,पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो लागतो.
नक्की वाचा:कशाला कुक्कुटपालनाचा सोस! करा 'हा' पर्यायी व्यवसाय, नक्कीच मिळेल भरपूर नफा
Share your comments