1. सरकारी योजना

पशुपालकांसाठी ब्रेकिंग! 60 हजार गाईला तर 70 म्हशीला आता मिळणार अनुदान, पशुपालकांना होईल फायदा

भारतामध्ये शेतकरीशेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात.पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून दुधाचे उत्पादन हा शेतकऱ्यांचा मुख्य आर्थिक स्त्रोत असतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
growth in subsidy of cow and buffalo purchasing by goverment

growth in subsidy of cow and buffalo purchasing by goverment

 भारतामध्ये शेतकरीशेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात.पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून दुधाचे उत्पादन हा शेतकऱ्यांचा मुख्य आर्थिक स्त्रोत असतो.

त्यामुळे चांगल्या दूध उत्पादनासाठी जातिवंत गाई व म्हशीपशुपालकांकडे असणाऱ्या खूपच महत्त्वाचे असते.या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरशासनाकडून देखील शेतकऱ्यांना पशुपालणा मध्ये आर्थिक साहाय्य व्हावे, या उद्देशाने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना अमलात आणल्या जातात व अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. याचाच भाग म्हणून आता महाराष्ट्र शासनाने दुधाळ जनावरांच्या वैयक्तिक लाभार्थ्यांच्या योजनेमध्ये गाय आणि म्हैस या दोन पशुधनाचे अनुदान वाढविण्याचा एक प्रस्ताव तयार केला असूनया प्रस्तावानुसार गाईला 60 हजार तर म्हशीला 70 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

नक्की वाचा:24 एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष ग्रामसभा

 याबाबतचा प्रस्तावराज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाच्या वतीने नियोजन विभागाकडे सध्या मान्यतेसाठी पाठवला आहे.लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असून या निर्णयामुळे दुधाळ पशुधनाचा सरकारी दरबारी भाव वाढणार आहे व याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

शासनाकडून राबवल्या जात असलेल्या योजनांमध्येशेळी व मेंढी सारखे छोटे पशुधन असो कीगाय आणि म्हशी सारखे मोठे पशुधन यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.पशुपालन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांच्यावतीने दुधाळ जनावरांची वैयक्तिक लाभार्थी योजना राबवली जात आहे.या योजनेमध्ये गाय,म्हैसया दोन पशुधनासाठीलाभार्थ्यांना आर्थिक मदत पशुपालन व दुग्ध विकास विभागाकडून केली जाते.एका या योजनेचा लाभ घेताना यामध्ये जास्तीत जास्त दोन गाई अथवा दोन म्हशी खरेदी करण्यासाठी अनुदानाच्या रूपात लाभार्थ्यांना मदत केली जाते.यायोजनेसाठी लाभार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतात अर्जाची पूर्तता केल्यानंतर अनुदानास पात्र ठरलेल्या पशुधनाच्या ठरलेल्या किंमत एवढी रक्कम लाभार्थ्यांना मिळते. सध्या या योजनेद्वारे गाय व म्हशी यासाठी प्रत्येकी 40 हजार रुपये अनुदान दिले जाते.

नक्की वाचा:बिगर बासमती तांदूळ निर्यातीत भारताची ६ अब्ज डॉलर्स ची उलाढाल, या देशांना पुरवला जातो तांदुळ

अनुदानाची रक्कम 2011 मध्ये निश्चित केली गेली होती. परंतु आता या दहा वर्षांमध्येभाववाढ झाल्याने पशुधनाच्या किमती वाढलेल्या आहेत.

मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम आणिपशुधनाचा बाजार भाव यामध्ये खूपच मोठा फरक असल्याने खरेदी करताना लाभार्थ्यांना पदरचे पैसे द्यावे लागत आहे.हे समस्या लक्षात घेऊन पशुपालन व दुग्ध विकास विभागाने गाईंसाठी 20000  हजारने तर म्हशीसाठी 30000 ने वाढ करून70 हजार रुपयांपर्यंतचे खरेदी किंमत ठरवली आहे व याचा फायदा  शेतकऱ्यांना होणार आहे.

English Summary: growth in subsidy of cow and buffalo purchasing by goverment Published on: 22 April 2022, 09:16 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters