1. पशुधन

Murghaas Tips:मुरघास बनवा 'अशा' पद्धतीने, टिकेल जास्त दिवस आणि जनावरे राहतील निरोगी

पशुपालनामध्ये जनावरांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि वाढीव दूध उत्पादनासाठी आहार व्यवस्थापनाची गरज असते. जर आहार संतुलित असेल तर जनावरांपासून मिळणारे दुधाचे उत्पादन हे देखील भरपूर मिळते. यासाठी शेतकरी विविध प्रकारच्या चारा पिकांचा उपयोग करतात. परंतु यामध्ये आता बरेच शेतकरी मुरघास बनवून त्याचा जास्त प्रमाणात जनावरांच्या आहारात वापर करतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
proper method of murghaas

proper method of murghaas

 पशुपालनामध्ये जनावरांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि वाढीव दूध उत्पादनासाठी आहार व्यवस्थापनाची गरज असते. जर आहार संतुलित असेल तर  जनावरांपासून मिळणारे दुधाचे उत्पादन हे देखील भरपूर मिळते. यासाठी शेतकरी विविध प्रकारच्या चारा पिकांचा उपयोग करतात. परंतु यामध्ये आता बरेच शेतकरी मुरघास बनवून त्याचा जास्त प्रमाणात जनावरांच्या आहारात वापर करतात.

परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मुरघास बनवतात त्या वेळेस काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते, नाहीतर  तयार मुरघास खराब होण्याची भीती जास्त असते. या लेखात आपण मुरघास तयार करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊ.

नक्की वाचा:दूध दरात एक रुपयाची वाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

अशा पद्धतीने बनवा मुरघास

 मुरघास बनवण्यासाठी जेव्हा आपण चाऱ्याची कुट्टी करतो तेव्हा तिला ताबडतोब खड्ड्यात किंवा पिशवीत भरली गेली पाहिजे. अगोदर दोन फुटाचा पहिला थर टाकून त्याला चांगले तुडवणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे संबंधित पिशवीत किंवा खड्ड्यात जास्त मुरघास बसतो.

पहिला थर दीड ते दोन फुटांचा असला पाहिजे व त्यापेक्षा जास्त जाडीचा जर राहिला तर त्यातील हवा काढणे खूप जिकिरीचे ठरते. यामध्ये एक फुटापर्यंत जेव्हा तुम्ही कुट्टी टाकाल तेव्हा तिला एक सारख्या पद्धतीने म्हणजेच समान पसरवून घ्यावी.

कुट्टी तुडवताना देखील काही दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. जसे जेव्हा कुटी तुडवाल तेव्हा एका व्यक्तीने तिला मध्ये तुडवावे व दुसऱ्या व्यक्तीने खड्डा किंवा पिशवीच्या बाजूने तुडवावे व त्यानंतर दोन्ही व्यक्तींनी बाजूने तुडवायला सुरुवात करावी. जेव्हा कुट्टीस सारखे तुडवली जाईल तेव्हा पिशवी किंवा खड्डा  योग्य रीतीने भरते.

नक्की वाचा:Milk Fat: 'या' उपाययोजना करा आणि वाढवा दुधातील फॅट,तरच येईल घरी आर्थिक गंगा

पहिल्यांदा मुरघास बनवत असाल तर..

 जर तुम्ही पहिल्यांदाच मुरघास बनवत असेल तर बाजारात उपलब्ध असलेले कल्चरचा वापर करणे गरजेचे आहे. जेव्हा एकावर एक थर भरायचे असतील तर ते हवाबंद राहतील याची खात्री करून घ्यावी. या सगळ्या गोष्टींचे जर काटेकोर पालन केले तर नक्की चांगल्या प्रतीचा मुरघास तयार होतो व एकदा बंद केल्यानंतर सारखे उघडू नका असं केल्यास त्यात हवा लागेल व मुरघास  खराब होण्याचे जास्त भीती असते.

 महत्वाचे

 मुरघास पंचेचाळीस दिवस ते साठ दिवस पूर्णपणे बंद करून ठेवावा व त्यानंतर तो खाण्यासाठी योग्य होतो. मुरघास याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची गुणवत्ता ही त्याच्या वासावरून ठरते.

मुरघास हिरवट पिवळा किंवा सोनेरी तपकिरी रंग आलेला असतो व वास आंबट-गोड येत असतो म्हणजेच तो आम्लधर्मी आहे.

 खराब मुरघासाची लक्षणे

 मुरघासाच्या रंग जर का काळसर व बुरशीयुक्त  असेल तर तो खराब झाला, असे समजावे. तसेच त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्याला घाण वास येतो. त्यामुळे अशा मुरघास जनावरांना खायला देणे नुकसानकारक ठरू शकते.

नक्की वाचा:Fantastic Bussiness:'या' व्यवसायात आहेत चांगल्या संधी,वाचा माहिती आणि करा सुरुवात

English Summary: this is the proper way to making murghass for animal fodder Published on: 08 August 2022, 05:47 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters