पशुपालन व्यवसाय भारतात मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुपालन व्यवसायामध्ये दूधउत्पादन हा एक उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असून गोठ्यातील जनावरांचे आहार व्यवस्थापन आणि त्यासोबतच त्यांचे आरोग्य व्यवस्थापन उत्तमरित्या करणे देखील तेवढेच गरजेचे असते.
आरोग्य व्यवस्थापन उत्तम राहिले तर जनावरे आजारी पडत नाही व त्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत नाही. जनावरांना अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. त्यामध्ये एक समस्या म्हणजे जनावरांना होणारी जंतबाधा ही होय.
जनावरांना जंतबाधा झाली तर जनावरांमध्ये तीव्र स्वरूपाची पोटदुखी दिसून येते तसेच आतड्यांमध्ये जर जंतू वाढले तर अन्न तुंबून राहते अन्नाचे नीट पचन होत नाही.
जनावरांमध्ये रक्त घटकांचे प्रमाण कमी कमी होत जाते व जनावरांमध्ये अंतर्गत स्वरूपाचा रक्तस्राव देखील होतो. अशा अनेक प्रकारच्या समस्या जंतबाधेमुळे निर्माण होतात. या लेखात आपण जनावरांना जंतबाधा होऊ नये म्हणून काही प्रतिबंधात्मक उपाय पाहू.
प्रतिबंधात्मक उपाय
1- वातावरणामध्ये होणारे अचानक बदल जसे की, पाऊस, थंडी इत्यादीपासून जनावरांचे संरक्षण करावे.
2- जनावरांचे आहार व्यवस्थापन करताना आहारामध्ये सूक्ष्म खनिजे, जीवनसत्वे, प्रथिने आणि कर्बोदके यांचा योग्य प्रमाणामध्ये वापर करून जनावरांना संतुलित आहार खायला घालावा तसेच प्यायला देखील स्वच्छ व मुबलक स्वरूपाचे पाणी द्यावे.
3- जनावरांचा गोठा हा कोरडा, स्वच्छ व नेहमी हवेशीर राहील याची काळजी घ्यावी. गोठा निर्जनतुक ठेवण्यासाठी वेळोवेळी योग्य औषधांचा वापर करावा. जंतांचा प्रसार ज्या कीटकांमार्फत होतो त्यांचा प्रसार नियंत्रणात ठेवावा.
नक्की वाचा:पशुजगत:गोठ्यातील जनावरांचा माज ओळखा आणि टाळा होणारे आर्थिक नुकसान, वाचा सविस्तर माहिती
4- जेव्हा जंत निर्मूलन मोहीम राबवाल तेव्हा ती विभागातील सर्व जनावरांची एका वेळेस राबवावी. त्यामुळे नव्याने होणाऱ्या जंत बांधेला थांबवता येऊ शकते.
5-आजाराची लक्षणे जनावरांमध्ये दिसली तर पशुवैद्यकाकडून सल्ला घ्यावा व रक्त, लघवी व शेण यांची प्रयोगशाळेमध्ये तपासणी करून आजाराचे निदान करावे.
6- आजारी आणि अशक्त तसेच बाधित जनावरे इतर निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे.
7- ज्या जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते अशा जनावरांमध्ये कृमींचा प्रादुर्भाव आपोआप कमी होत असतो. त्यांच्यावर कोणताही तणाव नसावा.
नक्की वाचा:Animal Care:पावसाळ्यात पशुधनाचे 'या' आजारांपासून करा रक्षण,'या' उपाययोजना ठरतील लाभदायी
Share your comments