आपल्याला सगळ्यांना चॉकलेट खायला आवडते. अगदी लहानपणापासून सगळ्या जणांनी चॉकलेट हे खाल्लेले असतेच. परंतु जनावरांसाठी देखील बाजारात चॉकलेट असल्याचे तुम्ही कधी ऐकली आहे का?
नसेल ऐकलं तर आम्ही तुम्हाला या लेखामध्ये त्या उपयुक्त चॉकलेट बद्दल सांगणार आहोत,जे खाल्ल्याने जनावरांमध्ये दूध उत्पादन वाढते.
ॲनिमल चॉकलेट म्हणजे काय?
जसे आपल्या माणसांना खाण्यासाठी चॉकलेट असते त्याचप्रमाणे प्राण्याना खाण्यासाठी चॉकलेट असते.यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात.
ते पोषक घटक प्राण्यांना आतून बळ देतात.कृषी विज्ञान केंद्र स्वतः पशुपालकांनी मध्ये त्यांच्या जनावरांना चॉकलेट खायला द्यावे याबाबत जागृती करत आहे.भारतीय पशु वैद्यकीय संशोधन संस्था, बरेली यांनी बनवलेले हे UMMB ॲनिमल चॉकलेट प्राण्यांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
केवीके सेंटर फॉर ॲग्रिकल्चरल सायन्सच्या शास्त्रज्ञांच्या मते, दररोज 500 ते 600 ग्राम हे चॉकलेट कोणत्याही प्राण्याला दिले पाहिजे.
कोंडा, मोहरीचे तेल, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मीठ, तांबे आणि जस्त इत्यादींचा वापरचॉकलेट बनवण्यासाठी केला जातो.भारतीय बाजारात या ॲनिमल चॉकलेट ची किंमत सुमारे 80 रुपये आहे.
या चॉकलेटच्या जनावरांना होणारे फायदे
1- जनावरांनी हे चॉकलेट खाल्ल्याने वंध्यत्वाचा धोका कमी होतो आणि त्याच वेळी ते खाल्ल्याने प्राण्यांचे प्रजनन क्षमता वाढते
2- गुरांमधील हिरव्या चाऱ्याची कमतरता दूर करण्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो.
3- या चॉकलेटच्या सेवन आणि प्राण्यांची पचनसंस्था निरोगी राहते आणि मग ते सिंपले आणि भिंती चाटत नाहीत.
4- जनावरांच्या दुधाचा व्यवसाय करणाऱ्या ब्रिडर साठी हे चॉकलेट एक वरदान असून हे चोक्लेट्स जनावरांना खायला दिल्याने त्यांचे दूध देण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते.
5- चॉकलेट प्राण्यांना प्रथिने पुरवते.
6-प्राण्यांमध्ये हार्मोनल संतुलन राखण्यासाठी देखील ही चॉकलेट खूप खूप उपयुक्त आहे.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो 'शेळी आणि कोंबडी'च्या आहाराची अशी घ्या काळजी; होईल बक्कळ नफा
नक्की वाचा:ठाकरे सरकारची पशुपालन योजना; शेतकऱ्यांना मिळतायेत गायी आणि म्हशी
Share your comments