1. पशुधन

Animal Rearing: कशा पद्धतीचे आहे इस्राईलमधील पशुपालन तंत्रज्ञान? कुठल्या बाबी आहेत आपल्याकडे उपयोगाचे?

इस्राईल म्हटले म्हणजे कृषी क्षेत्रात एक प्रगत आणि तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणारे राष्ट्र असे आपल्या डोळ्यासमोर येते. आख्या जागतिक पातळीवर इस्रायलने कृषी क्षेत्रात आपले नाव उंचावले आहे. कृषी क्षेत्र सोबतच पशुपालन क्षेत्रामध्ये देखील इस्राईल सगळ्यांच्या पुढे आहे. या लेखात आपण इस्राईलमधील पशुपालन तंत्रज्ञान कशा पद्धतीचे आहे? त्याबद्दल या लेखात थोडक्यात माहिती घेऊ.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
israiel technology of cow rearing

israiel technology of cow rearing

इस्राईल म्हटले म्हणजे कृषी क्षेत्रात एक प्रगत आणि तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणारे राष्ट्र असे आपल्या डोळ्यासमोर येते. आख्या जागतिक पातळीवर इस्रायलने कृषी क्षेत्रात आपले नाव उंचावले आहे. कृषी क्षेत्र सोबतच पशुपालन क्षेत्रामध्ये देखील इस्राईल सगळ्यांच्या पुढे आहे. या लेखात आपण इस्राईलमधील पशुपालन तंत्रज्ञान कशा पद्धतीचे आहे? त्याबद्दल या लेखात थोडक्यात माहिती  घेऊ.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो कमी कालावधीत बक्कळ पैसा कमवायचा आहे? तर प्लायमाउथ रॉक कोंबडीचे पालन कराच...

 इस्राईलमधील पशुपालन तंत्रज्ञान

 इस्रायली गोठ्याचे व्यवस्थापन-

1- याठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गोठ्यामध्ये दुधाळ गाई, पहिलाडू गाई, लहान वासरे,व्यायलेल्या गाई आणि भाकड गाई  यांच्यासाठी स्वतंत्र कप्पे अर्थात विभाग असतात.

2- गोट्याची अर्थात शेडची रचना करताना दिशा ही उत्तर-दक्षिण असून गेल्वनाईझ पाईपने  शेडची रचना केलेली असते. उंची 25 ते 30 फूट असल्यामुळे शेडमध्ये नेहमीच हवा खेळती राहते.

3- मुक्त संचार गोठा पद्धतीमध्ये दोन्ही बाजूंना गाईंची एक समान संख्या तसेच मुक्त संचार गोठ्याच्या चहुबाजूंनी लोखंडी तारेचे कुंपण केलेले असते.

4- गोठ्याचे छतावर सोलर पॅनल बसवून त्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते. गोटा थंड रहावा यासाठी दर वीस फुटांवर पंखे असतात. तसेच फॉगर्सच्या माध्यमातून गाईंना थंड ठेवण्यासाठी पाण्याचे फवारे गायीच्या अंगावर सोडण्यात येतात.

5- दोन्ही गोठ्याच्या मध्यभागी चारा देण्यासाठी तीन फुटांचा गाळा असतो. यामध्ये एका ट्रॉली मधून पशुखाद्य मिश्रण सर्व गाईंना योग्य प्रमाणात दिली जाते.

6- विशेष म्हणजे प्रत्येक गाईच्या पायाला सेन्सर टॅग असतात. प्रत्येक गाईला उभे राहता यावे यासाठी तीन चौरस मीटर एवढे क्षेत्रफळ असते.

7- गोठ्यात गाईंना व उभे राहण्यासाठी असलेली जागा आणि खाद्य पुरवण्याच्या जागेचा भाग सिमेंट कॉंक्रिटचा किंवा फरशीचा असतो.

8- गोठ्यामध्ये दगड, फरशी किंवा सिमेंट कोबा इत्यादी भाग गाईंचा शरीर ताण वाढवतात. त्यामुळे गाईंना फिरण्यासाठी आणि आराम करण्याची जागा मातीच्या साह्याने भुसभुशीत ठेवलेली असते.

9- चारा खाल्ल्यानंतर गायी बराच वेळ मुक्त संचार पद्धतीत आरामशीर रवंथ करतात व पुरेशा मोकळ्या जागेत पुरेसा दैनंदिन व्यायाम केल्याने शरीर ताण आपोआप कमी होतो. गोठ्यामध्ये असलेल्या थंड हवेमुळे गाईंच्या दूध देण्याच्या प्रमाणात  वाढ होते.

10- गोठ्यामध्ये शेण, मुत्राचे एकत्र संकलन करून एका पाइपद्वारे टाकीमध्ये वाहून नेले जाते. नंतर या टाकीत प्रक्रिया करून शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे गोठ्यात कुठल्याही प्रकारच्या माशा किंवा इतर घाणेरडा वास वगैरे येत नाही.

नक्की वाचा:भारतातील 5 टॉप देशी गायींचे करा पालन; एका गाईचे पालन केले तरी होईल भरपूर कमाई

 मिल्किंग पार्लर

1- गाईचे दूध प्रामुख्याने मिल्किंग यंत्राद्वारे काढले जाते. यामध्ये फ्लोमीटर जोडल्याने सडातून दूध देण्याचे प्रमाण, सडातून किती वेळात किती दूध येते तसेच कासदाह रोगाचे निदान अगोदर करता येते.

2- गाईंना धार काढण्यासाठी पार्लर मध्ये आणायचे आधी त्यांच्या अंगावर 30 सेकंद थंड पाण्याचा फवारा आणि पुढे 30 सेकंद पंखे चालू करून वारा सोडला जातो. त्यामुळे गाईंवर येणारा तापमानाचा ताण कमी होतो व दूध उत्पादन क्षमता वाढते.

3- एकावेळी 32 गाईंची धार काढली जाते. एक तासाचा विचार केला तर सरासरी 270 गाईंची धार काढली जाते दिवसातून तीन वेळा गाईंची धार काढली जाते.

4- मिल्किंग मशिनच्या माध्यमातून काढले गेलेले दूध पाईपने गोळा करून 44 हजार लिटर क्षमतेच्या टॅंक मध्ये गोळा केले जाते. त्या ठिकाणी 48 तासांपर्यंत साठवून ठेवले जाते व हे शीतकरण केलेले दूध प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाकडे पाठवले जाते.

संतुलित खाद्य पुरवठा कसा असतो?

1- हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी असली तर गाईंना गव्हाच्या काडापासून तयार केलेला मुरघास बारीक करून मिक्स राशनच्या स्वरूपात दिला जातो.

2- मिक्स राशनमध्ये मूरघास तीस ते पस्तीस टक्के, सरकी पेंड, शेंगदाणा पेंड, सूर्यफूल पेंड आणि भरडलेला मका इत्यादी असे एकूण अकरा खाद्य घटकांचा समावेश केला जातो.

3- टोटल मिक्स राशन देण्याच्या यंत्रामध्ये फीड ट्रोल संगणक प्रणालीचा वापर केलेला असतो. मुरघास आणि त्यामध्ये मिसळल्या जाणाऱ्या अकरा खाद्य मिश्रणाचे प्रमाण संगणक प्रणालीनुसार टीएमआर वॅगनमध्ये भरून व्यवस्थित मिसळले जाते व त्यानंतर खाद्याचा पुरवठा केला जातो.

4- लहान वासरांना दूधापासून तोडल्यानंतर मिल्क रिप्लेसरचा स्वरूपात कृत्रिम दूध दिले जाते.

नक्की वाचा:मांस उत्पादनासाठी माडग्याळ मेंढीची जात प्रसिद्ध; पालनाने शेतकरी होणार श्रीमंत

English Summary: so important technology in israiel to animal husbandry especiely of cow rearing Published on: 29 September 2022, 10:52 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters