1. पशुसंवर्धन

पशुसंवर्धन विभागाच्या योजना लाभार्थ्यांकडून मागविले अर्ज

KJ Maharashtra
KJ Maharashtra
scheme for animal

scheme for animal

सन 2021 ते 22 या वर्षासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना साठी वाशिम जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून 1 ते 31 जुलै 2021 दरम्यान पंचायत समिती स्तरावर अर्ज मागविण्यात येत आहे.

या पशुसंवर्धन विभागाच्या योजना द्वारे अनुसूचित जाती, नवबौद्ध  लाभार्थ्यांना तसेच आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरांचा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांची निवड झाल्यास लाभार्थ्यांना त्यांचा लाभार्थी हिस्सा म्हणजे रुपये एकवीस हजार 265 रुपये एक महिन्याच्या आत चलनाद्वारे भरावे लागतील. जेव्हा संबंधित योजनेचे अनुदान लाभार्थ्यांना प्राप्त होईल तेव्हा प्राप्त लाभार्थ्यांना दोन दुधाळ जनावरे राज्याबाहेरून किंवा जिल्ह्याबाहेरील गुरांच्या बाजारातून खरेदी करून देण्यात येतील.

 

 शेळीच्या  बाबतीत विचार केला तर विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध लाभार्थ्यांना व आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर दहा शेळ्या व एक बोकड असा गटाचा पुरवठा करण्यात येईल. जर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड झाली तर  एक महिन्याच्या आत उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळी च्या जाती साठी 25 हजार 886 रुपये व स्थानिक जातीसाठी 19 हजार 558 रुपये लाभार्थी हिस्सा चलनाद्वारे भरावा लागेल. पशुसंवर्धन विभागाच्या या योजनेअंतर्गत तलंग वाटप योजना आहे.

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी तीन हजार रुपये किमतीच्या पंचवीस मादी व तीन नर तलंगा गट पुरवण्यात येतील.

 एवढेच नाही तर वैरण व पशुखाद्य विकास या सर्वसाधारण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर पशुपालक शेतकऱ्यांसाठी वैरण बियाणे वाटप करते ही योजना राबवण्यात येत आहे. या वैरण वाटप योजनेअंतर्गत पंधराशे रुपये मर्यादेत वैरण बियाणे वाटप करण्यात येईल.

 या सर्व योजनांची अर्जाचे नमुने पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागात उपलब्ध आहेत. तसेच लाभार्थ्यांचे अर्ज हे स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा पंचायत समिती स्तरावर स्वीकारले जातील.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters