सध्या जनावरांमधील लंपी (lumpy) आजाराने धुमाकूळ घातला आहे. शेतकरी वर्गाला जनावरांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. लंपी हा जनावरांमधील त्वचा रोग आहे.
राज्यस्थान, गुजरात राज्यात लंपी आजाराने (lumpy disease) धुमाकूळ घातला होता. यानंतर आता राज्यातही पसरायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पुण्यातील जुन्नर येथील पशुधनाला या रोगाची लागण झाली होती.
यानंतर आता अकोला जिल्ह्यात देखील या रोगाने शिरकाव केला आहे. अकोल्यातील मौजे निपाणा (ता. अकोला), तसेच अकोट व तेल्हारा तालुक्यात जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे.
एकाच दिवशी वाढलेल्या संपत्तीमुळे अदानी वरच्या क्रमांकावर गेले, आकडा वाचून डोळे होतील पांढरे
जिल्ह्यात सध्या १०९ जनावरांना या आजाराची (disease) लागण झाली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असून, त्वचेचे खरड व रक्त नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
जनावरांमध्ये जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता लक्षात घेऊन संक्रमण, सांसर्गिक रोगप्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमानुसार संसर्गकेंद्रापासून १० किलोमीटर बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.
सर्वसामान्यांना मोठा दिलासा; गॅस सिलिंडर झाला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त
पशूपालकांसाठी टोल फ्री नंबर जारी
हा रोग वाढल्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे पशुपालकांना विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
या आजारासंबंधी माहिती देण्यासाठी १९६२ हा टोल फ्री क्रमांकही जारी करण्यात आला आहे. यावर पशुपालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
सरकारच्या 'या' योजनेत दररोज जमा करा फक्त 233 रुपये; 17 लाख रुपयांचा मिळणार लाभ
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; शेततळे बांधण्यासाठी 2 लाख रुपयांपर्यंत मिळणार अनुदान
पीकविमा योजनेअंतर्गत 'माझी पॉलिसी माझ्या हातात' उपक्रम सुरू; शेतकऱ्यांना होणार फायदा
Share your comments