1. पशुधन

बंधुंनो! जास्तीच्या दूध उत्पादनासाठी गाय खरेदी करायची असेल तर 'या' गायीचा करा विचार,नक्कीच होईल फायदा

पशुपालन व्यवसाय हा शेतकऱ्यांचा आधारस्तंभ असून या व्यवसायाच्या माध्यमातून दुधाचे उत्पादन व त्याची विक्री हा एक खरा आर्थिक पाया आहे. दूध उत्पादनासाठी शेतकरी म्हशी किंवा गाईंचे पालन करतात. परंतु गाय किंवा म्हैस पालन करत असताना वाढीव उत्पादनासाठी त्यांच्या प्रजाती देखील तितकेच महत्त्वाचे असतात. जेणेकरून जातिवंत प्रजातींच्या माध्यमातून नक्कीच दूधउत्पादनात वाढ होते व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. कारण दुधाचे बाजार पेठ खूप विस्तीर्ण असून दुधाची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
phule triveni cow

phule triveni cow

पशुपालन व्यवसाय हा शेतकऱ्यांचा आधारस्तंभ असून या व्यवसायाच्या माध्यमातून दुधाचे उत्पादन व त्याची विक्री हा एक खरा आर्थिक पाया आहे. दूध उत्पादनासाठी शेतकरी म्हशी किंवा गाईंचे पालन करतात. परंतु गाय किंवा म्हैस पालन करत असताना वाढीव उत्पादनासाठी त्यांच्या प्रजाती देखील तितकेच महत्त्वाचे असतात. जेणेकरून जातिवंत प्रजातींच्या माध्यमातून नक्कीच दूधउत्पादनात वाढ होते व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. कारण दुधाचे बाजार पेठ खूप विस्तीर्ण असून दुधाची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे.

जर यामध्ये आपण गाईच्या दुधाचा विचार केला तर  या दुधाला खूप मागणी असून तुम्हाला जरी दूध व्यवसाय करायचा असेल तर गाईंचे पालन खूप महत्त्वाचे ठरते. याच अनुषंगाने आपण या लेखात एका संकरित गाईच्या जातीची माहिती घेणार आहोत. जी वाढीव उत्पादनासाठी खूप महत्त्वाचे आहे.

नक्की वाचा:ऐकलं व्हयं…! पशुपालक शेतकरी लखपती बनतील..! 'हे' तीन पशुघास पशुची दूध उत्पादन क्षमता वाढवतील, वाचा सविस्तर

 वाढीव दूध उत्पादनासाठी महत्वाची 'फुले त्रिवेणी गाय'

 फुले त्रिवेणी गाय ही तीन जातींचा संकर असून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील शास्त्रज्ञांनी प्रचंड मेहनत घेऊन त्रिवेणी गाईची पैदास केली आहे.

स्थानिक गिरगाय सोबत जर्सी या विदेशी वळूचा संकर करून 50 टक्के जर्सी आणि 50 टक्के गिर गाय तयार करण्यात आली आहे. या संकरित गिर गाईचे प्रजोत्पादन क्षमता, त्यासोबतच वातावरणाच्या विविध देशी जुळवून घेण्याची क्षमता व दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण देखील चांगले दिसून आले आहे.

नक्की वाचा:आता वाहणार दुधाची नदी! दूधउत्पादकांनो गाई-म्हशींना द्या हा हिरवा चारा, होईल भरघोस दुधवाढ

 फुले त्रिवेणीची वैशिष्ट्ये

1- जर आपण या गाईपासून मिळणाऱ्या दूध उत्पादनाचा विचार केला तर एका वेतापासून जास्तीत जास्त सहा ते सात हजार लिटर दूध देते.

2- फुले त्रिवेणी गाईच्या दुधात 5.2 टक्के फॅट मिळतो.

3- तसेच इतर गायीच्या तुलनेत या गाईचे रोगप्रतिकारक शक्ती देखील खूप चांगली आणि भक्कम आहे.

4- पुढच्या पिढीतही दूध उत्पादनाचे प्रमाण टिकून राहते व दुधउत्पादनात सातत्य राहते.

5- या गाईचा भाकड काळ 70 ते 90 दिवसांचा आहे.

6- आपण दररोज सरासरी दुधाच्या प्रमाणाचा विचार केला तर ते 10 ते 12 लिटर इतके आहे.

7- फुले त्रिवेणी जातीच्या कालवडी अठरा ते  20 महिने वयाचे असताना माजावर येतात.

8- पहिली गर्भधारणा वीस ते बावीस महिन्यात होते.

9- या गाईचे आणखी महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या गाईंच्या दोन वेतातील अंतर 13 ते 15 महिने असते.

नक्की वाचा:दूधउत्पादकांनो इकडे द्या लक्ष! जनावरांना चाऱ्यासोबत मीठ खाणे आहे खूप महत्वाचे; जाणून घ्या कारण...

English Summary: phule triveni cow is so crucial gor milk production in animal husbundry Published on: 08 August 2022, 10:17 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters