शेळीपालनासाठी शेळीच्या सर्वात लहान जातीचा शोध घेत असलेले शेतकरी आणि पशु पालकांसाठी 'नायजेरियन डॉर्फ' ही सगळ्यात लहान शेळीची जात आहे. शेळी जितके लहान तितकी शेळी अधिक फायदेशीर असते. या लेखात आपण या शेळ्यांची गोट फार्मिंग कशी सुरू करावी याबद्दल माहिती घेऊ.
नायजेरियन बटू शेळीची वैशिष्ट्ये
1- ही शेळीची जात शेळीपालनात जगभरात लोकप्रिय आहे.
2- ही जात जगभर आढळते आणि बहुउद्देशीय बुटकी शेळीची जात आहे.
3- नायजेरियन बटू शेळी ही मांस आणि दूध उत्पादनासाठी शेळीचे सर्वोत्तम जात मानली जाते.
4- ही शेळी देखभालीत आणि तिच्या लहान उंचीमुळे शेळीपालनात योग्य आहे.
5- चांगले दूध आणि मांस उत्पादन क्षमतेसह नायजेरियन बटू शेळ्या पाळीव प्राणी म्हणून संगोपन करण्यासाठी देखील उत्तम आहे.
6- नायजेरियन डॉर्फ शेळ्या इतर शेळ्यांच्या तुलनेत जास्त दूध उत्पादक आहेत.
नक्की वाचा:जमुनापरी शेळी' देईल शेळीपालनात बंपर नफा, घ्या 'या' गोष्टींची काळजी
नायजेरियन डॉर्फ शेळी पालन कसे सुरु करावे?
या शेळ्यांचे शेळीपालन व्यवसाय सुरू करणे इतर कोणत्याही शेळ्यांच्या जातींचा शेळीपालन व्यवसाय सुरू करण्या सारखे आहे.
नायजेरियन डॉर्फ शेळी लहान प्राणी असून त्यांची काळजी घेणे खरोखर सोपी आहे. त्यामुळे या शेंळ्याना घेऊन शेळीपालन व्यवसाय सुरू करता येणे खूप सोपे आहे.
नायजेरियन डॉर्फ शेळीचे गोठ्याची व्यवस्था
या शेळ्यांसाठी स्वच्छ आणि कोरड्या गोठ्याची व्यवस्था करणे चांगले असते.गोठ्याची व्यवस्था करताना ती जमिनीपासून उंच असेल अशा पद्धतीने करावी.
गोठ्याची निर्मिती करताना ते तुम्हाला सहज रित्यास्वच्छ करता येईल अशा पद्धतीने बनवा. गोठ्याची रचना करताना त्यामध्ये पुरेशी ताजी हवा आणि गोठ्यामध्ये पुरेसा प्रकाश असल्याची खात्री करा. या जातीच्या एका शेळीला सुमारे दहा चौरस फूट जागा लागते.
नक्की वाचा:पाळा 1 हजार कडकनाथ कोंबड्या अन कमवा 10 लाख रुपये, कसे ते जाणून घ्या
नायजेरियन डॉर्फ(बटू) शेळी चारा व्यवस्थापन
या शेळ्यांच्या शेळीपालन व्यवसायाचाbसर्वात महत्त्वाचा भाग शेळ्यांना पुरेसा पौष्टिक आहार देणे हा होय. त्यामुळे कायम शेळ्यांना पौष्टिक आहार मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे असते.
त्यांच्या शारीरिक गरजेनुसार त्यांना चारा खायला घालणं आवश्यक आहे. या शेळीला इतर शाळांप्रमाणेच जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील आवश्यक असतात. तसेच पुरेशा प्रमाणात ताजे आणि शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा.
नायजेरियन डॉर्फ(बटू) शेळीची पैदास
या शेळ्या उत्कृष्ट प्रजनन क्षमता असणाऱ्या असून वर्षभर प्रजनन करू शकतात. यशस्वी प्रजनना नंतर त्यांचा गर्भधारणा कालावधी सुमारे 145 दिवसांपासून 153 दिवसांपर्यंत असतो.
एक शेळी दोन ते तीन पिल्लांना जन्म देऊ शकते. ही शेळी सात ते आठ महिन्यात परिपक्व होते.
नायजेरियन डॉर्फ(बटू) शेळीची काळजी
ही शेळी खूप मजबूत आणि कठोर असून त्यांना सहसा जास्त काळजी घ्यावी लागते. कारण चांगले व्यवस्थापन ठेवल्यास त्यांची वाढ निरोगी रीतीने होते.
नक्की वाचा:बोअर शेळी पाळा अन शेळीपालनात मिळवा भक्कम आर्थिक स्थैर्य, जाणून घ्या बोअर शेळीचे वैशिष्ट्य
Share your comments