सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१३ पासून गोकुळ दूध संघ दूध संकलन करीत आहे. याठिकाणी या संघामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला आहे. अनेक अडचणींचा सामना करून संघाचे काम सुरू आहे. पदाधिकाऱ्यांनी आपल्याला जिल्ह्याचे दूध संकलन १ लाख लिटरपर्यंत न्यायचे आहे.
आता यासाठी जिल्ह्यातील दूध उत्पादन (Milk Production) १ लाख लिटरपर्यंत वाढविण्यासाठी गोकुळ संघ जिल्ह्यात आनंद पॅटर्न राबविणार आहे. याबाबतची माहिती पदाधिकाऱ्यांना दिली आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
त्यासाठी दूध संघाकडून सहकार्याची अपेक्षा आहे. यावेळी दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात आलेला आनंद पॅटर्न सिंधुदुर्गात राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे शेतकरी अजूनच सुजलाम सुफलाम होईल, अशी अपेक्षा आहे.
शेतकऱ्याला दुष्काळात तेरावा महिना! ४ लाखांच्या डाळींबाची चोरी
यामधून दूध उत्पादक शेतकऱ्यांना व्यवस्थापन, गुंतवणूक या बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच या जिल्ह्यात गोकुळचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात येईल. जिल्ह्यासाठी १० अनुभवी डॉक्टर देण्यात येणार आहेत.
सरकारी गोदामांमध्ये डाळींचा बफर स्टॉक उपलब्द, किमती राहणार नियंत्रणात, ग्राहक मंत्रालयाची माहिती..
शेतकऱ्यांच्या समस्या यामधून सोडवल्या जाणार आहेत. तसेच चारा निर्मिती आणि प्रशिक्षण केंद्र देखील सुरू करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
ऊस दराचे आंदोलन पेटले, पंढरपुरात आंदोलनाला हिंसक वळण, ट्रॅक्टरचे टायर फोडले..
बिग ब्रेकिंग! ई-पीक पाहणीची अट रद्द, शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत..
घामाच्या दामाला योग्य भाव न मिळाल्यास साखर आयुक्तांची खुर्ची जाळू- अतुल खूपसे-पाटील
Share your comments