1. पशुधन

राज्यात आता खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालये, राज्य सरकारचा निर्णय...

विद्यापीठाच्या अधिनियमात सुधारणा करणारे विधेयक विधिमंडळांच्या दोन्ही सभागृहांत बहुमताने मंजूर करण्यात आले. राज्यात महाराष्ट्र पशू व मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठांतर्गत खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालये सुरू करता येणार आहेत.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
private veterinary colleges in the state (image google)

private veterinary colleges in the state (image google)

विद्यापीठाच्या अधिनियमात सुधारणा करणारे विधेयक विधिमंडळांच्या दोन्ही सभागृहांत बहुमताने मंजूर करण्यात आले. राज्यात महाराष्ट्र पशू व मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठांतर्गत खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालये सुरू करता येणार आहेत. 

हे विधेयक मंजूर झाल्याने मुंबई, नागपूर, शिरवळ, उदगीर येथे असलेल्या पशू व्यवसाय विज्ञान महाविद्यालये तसेच नव्याने स्थापन झालेल्या महाविद्यालयांना विद्यापीठाची संलग्नता दिली जाणार आहे. राज्यातील पशुधनाच्या तुलनेत पशुवैद्यक, पशुविकास अधिकाऱ्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय पशू विज्ञान अकादमीच्या धोरणात्मक लेखानुसार देशात ७५ हजार पशुवैद्यकांची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात ३५ हजार ५०० इतकेच मनुष्यबळ आहे. यामुळे हा आकडा खूपच कमी आहे.

राज्यातील 85 लाख 66 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1866 कोटी रुपये रक्कम वितरित

क्षेत्रीय सेवा व शिक्षण संस्थांमध्ये सुमारे ५० टक्के पशुवैद्यकांची कमतरता आहे. तर २०३५ पर्यंत देशात १ लाख २५ हजार पशुवैद्यकांची गरज लागणार असल्याचे राष्ट्रीय पशू विज्ञान अकादमीचे म्हणणे आहे.

पिकविम्याच्या मदतीसाठी आता 92 तास मुदत करणार, केंद्राकडे पाठपुरावा करणार, कृषीमंत्र्यांची माहिती

राज्यात एकूण पशुधनांची संख्या ही ३३.१ लाख इतकी आहे. खासगी क्षेत्र वगळता, इतर पशुधनासाठी राज्यात सध्या ६ हजार ६०० हून अधिक पशुवैद्यक पदवीधरांची गरज आहे. यामुळे सरकार याकडे लक्ष देत आहे.

सासवडमध्ये ज्वारीला उच्चांकी ६३११ रुपये दर, शेतकऱ्यांना दिलासा...
या फुलाची लागवड करून शेतकरी होत आहेत श्रीमंत, जाणून घ्या कशी केली जाते लागवड
गायीच्या दुधाला 34 रुपयांचा दर ही फसवी दरवाढ, दूध संघचालक तुपाशी, शेतकरी उपाशी; शेतकऱ्यांनी केले आंदोलन

English Summary: Now private veterinary colleges in the state, the decision of the state government... Published on: 29 July 2023, 12:46 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters