1. सरकारी योजना

राज्यातील 85 लाख 66 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1866 कोटी रुपये रक्कम वितरित

सीकर राजस्थान येथे देशातील 8.5 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याची रक्कम डीबीटी द्वारे वितरित करण्यात आली. या निमित्ताने आयोजित किसान संमेलमास मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे साहेबांसमवेत दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित राहिलो.

farmar (image google)

farmar (image google)

सीकर राजस्थान येथे देशातील 8.5 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याची रक्कम डीबीटी द्वारे वितरित करण्यात आली. या निमित्ताने आयोजित किसान संमेलमास मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांसमवेत दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित राहिलो.

याद्वारे राज्यातील 85 लाख 66 हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1866 कोटी रुपये रक्कम वितरित करण्यात आली आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. दादाजी भुसे तसेच ठाणे, पालघर, रायगड आदी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.

राज्य शासनाच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांना सहभागी होता यावे, यासाठी 12980 ठिकाणी या किसान संमेलनाच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती व याद्वारे राज्यातील सुमारे साडेपाच लाख शेतकरी बांधव या संमेलनात व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाले होते.

कोल्हापूर, सांगलीचे पुराचे संकट टळणार? अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग वाढवला

या 14 व्या हप्त्याद्वारे 17,000 कोटींहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीकरमध्ये एका सरकारी कार्यक्रमात अनेक विकासकामांची पायाभरणीही केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यासोबतच त्यांनी १.२५ लाख किसान समृद्धी केंद्रांचेही उद्घाटन केले आहे.

गंगातीरी गाय: देते 10 ते 16 लिटर दूध, जाणून घ्या...

याद्वारे शेतीशी संबंधित प्रत्येक माहिती, प्रत्येक योजनेची माहिती, त्याचे फायदे आदी माहिती दिली जाणार आहे. आज, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना सुमारे 18,000 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे, जी थेट त्यांच्या खात्यात येत आहे.

शेतकर्‍यांना मोठी भेट, PM मोदींनी किसान सन्मान योजनेचा 14 वा हप्ता केला जारी
कापूस दरात ३०० रुपयांची वाढ, वाढ कायम राहण्याची शक्यता..

English Summary: An amount of Rs.1866 crore has been distributed to the bank accounts of 85 lakh 66 thousand farmers in the state Published on: 28 July 2023, 10:12 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters