भारत हा कृषिप्रधान देश असून भारतीय शेतकरी शेती सोबतच विविध प्रकारचे जोड धंदे करतात. यामध्ये पशूपालन, कुकुट पालन आणि शेळीपालन यांना खूप प्रकारचे महत्त्व आहे. या तीनही जोडधंदा पैकीशेळी पालन हा व्यवसाय अगदी कमीत कमी गुंतवणुकीत आणि कमी जागेत जास्त नफा देणारा व्यवसाय आहे.
त्यामुळे बरेच शेतकरी शेळी पालन हा व्यवसाय करतात. आत्ताच्या काळात बर्याच सुशिक्षीत बेरोजगार तरुण शेळीपालन व्यवसाय कडे मोठ्या प्रमाणात वळत असून त्यांच्यासाठी एक आर्थिक उत्पन्नाचा एक चांगला स्त्रोत म्हणून शेळीपालन व्यवसाय नावारुपास येत आहे.
अशा युवकांना विविध शेळ्यांच्या जातींची माहिती व्हावी म्हणून आपण कृषी जागरणच्या माध्यमातून शेळ्यांच्या जातीची माहिती देत आहोत. या लेखामध्ये आपण अशाच एका तीन शेळ्यांच्या जातींची माहिती घेणार आहोत.
या आहेत शेळ्यांच्या चांगल्या उत्पादनक्षम जाती
1- नंदीदुर्गा शेळी- या शेळीची जात कर्नाटक राज्यात आढळते. या शेळीचा चेहरा, खूर आणि पापणी काळ्या रंगाचे आहे. या शेळ्या प्रामुख्याने मांस मिळवण्यासाठी पाळल्या जातात.
शेळ्या जुळ्या करडांना जन्म देतात. त्यामुळे सहाजिकच दुप्पट नफा होतो.मादी शेळीचे वजन 25 ते 42 किलो असते तर नराचे वजन 56 किलोपर्यंत असते. त्यामुळे ऊस उत्पादन जास्त मिळते.
2- बिद्री शेळी-शेळी कर्नाटकच्या उत्तर पूर्व भागात आढळते.तिचा रंग सामान्यतः काळा असतो. तिचे कान खाली वाकलेल्या आहेत. हे प्रामुख्याने मांसासाठी देखील पाळली जाते.
एका वर्षात सरासरीएक ते दोन करडांना जन्म देते.मादीचे वजन 45 किलो असते आणि नराचे वजन 50 किलो पर्यंत असते. या जातीची शेळी जुळ्या करडांना जन्म देते.
3- भाखरवाली शेळी- ही शेळी जम्मू काश्मीर राज्यात आढळते. या शेळी चा रंग पांढरा आणि काळा अशा दोन्ही प्रकारचा असतो. तिचे शिंगे खाली वाकलेले असतात.
या जातीची शेळी दूध आणि मांस दोन्हीसाठी पाळली जाते. या शेळी पासून दररोज सरासरी 900 मिली दूध मिळते. या जातीच्या मादी शेळीचे वजन 50 किलो आणि नराचे वजन 60 किलो पर्यंत असते. या शेळीपालनातून भरपूर नफा मिळू शकतो.
Share your comments