1. पशुधन

दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे तर या'4'म्हशिंचे पालन देईल आर्थिक भरभराट, जाणून घेऊ सविस्तर माहिती

आपल्या देशाची मोठी लोकसंख्या म्हशी पालनाशी संबंधित आहे. येथे म्हशीच्या अनेक जाती पाळल्या जातात सेंट्रल बेफेलो रिसर्च इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार म्हशीच्या 26 प्रकारच्या जाती पाळल्या जातात,

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
this four species of buffalo is give more profit and milk production

this four species of buffalo is give more profit and milk production

आपल्या देशाची मोठी लोकसंख्या म्हशी पालनाशी संबंधित आहे. येथे म्हशीच्या अनेक जाती पाळल्या जातात सेंट्रल बेफेलो रिसर्च इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार म्हशीच्या 26 प्रकारच्या जाती पाळल्या जातात,

 ज्या त नागपुरी,पंढरपुरी,बन्नी,मुऱ्हा,निलीरवी,जाफराबादी, चिल्का, भदावरी सुर्ती, मेहसाणा तोडा इ.यापैकी बारा जाती या नोंदणीकृत जाती आहेत, ज्या जास्तीत जास्त दूध देण्यासाठी ओळखल्या जातात.

यामध्ये चिल्का, मेहसाणा,सुर्ती, या म्हशींचा समावेश आहे अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला म्हशींच्या या जातींची माहिती देणार आहोत.

नक्की वाचा:दुग्ध व्यवसायात फायद्याच्या आहेत 'या' 50 लिटर दूध देणाऱ्या देशी गाई, वाचा सविस्तर माहिती

1) सुरती म्हशीची जात :

ही जात गुजरातमधील खेडा आणि बडोदा येथे आढळते.यांचा रंग तपकिरी,  राखाडी किंवा काळा असतो.ते मध्यम आकाराचे आहे,  टोकदार धड आणि  लांब डोके आहे.

त्यांची शिंगे विळ्याच्या आकाराची असतात. त्यांची सरासरी दूध उत्पादन क्षमता 900 ते 1300 लिटर प्रति वेत आहे. या जातीच्या म्हशीच्या दुधात 8 ते 12 टक्के फॅटचे प्रमाण आढळते.

2) मेहसाणा म्हशीची जात :

 ही जात गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील काही भागात आढळते. या जातीच्या म्हशीचा  रंग काळा असतो, तर काहींचा रंग काळा-तपकिरी आढळतो. त्यांचे शरीर मुऱ्हा जातीच्या म्हशीपेक्षा खूप मोठे असते.

पण त्यांचे वजन त्यांच्यापेक्षा कमी आहे. त्यांची शिंगे विळ्यासारखी असतात, तर मुऱ्हा म्हशीपेक्षा कमी फिरतात त्याचे सरासरी दूध उत्पादन 1200 ते 1500 लिटर प्रति वेत आहे.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो हा चारा ठरतोय फायदेशीर, गाईच्या दुधात होईल दुप्पट वाढ

3) तोडा म्हशीची जात :

 तामिळनाडूच्या निलगिरी डोंगरात आढळणाऱ्या आदिवासींच्या नावावरून या म्हशीच्या जातीला नाव देण्यात आले आहे. या जातीच्या अंगावर खूप जाड केसांचा आवरण असतो.

त्यांची सरासरी दूध उत्पादन क्षमता 500 ते 600 लिटर  प्रति वेत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या दुधात 8 टक्के फॅट असते.

4) चिल्का म्हशीची जात :

 म्हशीची ही जात ओरिसातील कटक, गंजम, पुरी, आणि खुर्दा जिल्ह्यात आढळते. या म्हशीचे नाव ओरिसातील चिलिका तलावावरून पडले आहे. त्याला 'देसी' या नावानेही ओळखले जाते.

ही म्हैस खाऱ्या भागात जास्त आढळते. त्याचा रंग तपकिरी-काळा किंवा काळा असतो. ते मध्यम आकाराचे असून, प्रति वासराचे सरासरी दूध उत्पादन 500 ते 600 वेत असते.

नक्की वाचा:Animal Fodder:गाई-म्हशींना हा चारा खाऊ घाला,दूध देतील जास्त प्रमाणात,वाचा या चाऱ्याची वैशिष्ट्ये

English Summary: this four species of buffalo is give more profit and milk production Published on: 27 June 2022, 09:48 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters