दुधाचे उत्पादन (Milk production) टिकून राहण्यासाठी शेतकरी अनेक प्रयोग करत असतात. परंतु शेतकऱ्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याने त्यांना दुग्धव्यवसायात तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे आज आपण दुधाचे उत्पादन टिकून कसे राहील? यावर उपाय कोणता? याविषयी जाणून घेणार आहोत.
दुधाळ जनावरांमध्ये (Milky Animals) दुधाचे उत्पादन (Milk Production) आणि प्रजननक्षमता टिकवून ठेवण्यासाठी खनिज(mineral mixtures) महत्वाची भूमिका बजावते. जनावरांच्या शरीरामधून वेगवेगळ्या मार्गाने खनिजे बाहेर पडतात. त्यांची उणीव भरून काढण्यासाठी खनिज मिश्रणाची गरज असते.
हाडांमध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरसची मात्रा राखून ठेवण्यासाठी, रक्तात लाल पेशींच्या निर्मितीसाठी आणि पाचक रसांच्या उत्तम कार्यासाठी खनिजे आवश्यक असतात. जनावरांच्या खाद्यात खनिज मिश्रणाचे महत्व काय, याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहूया.
Horoscope: 'या' 5 राशीच्या लोकांना मिळणार प्रचंड यश; वाचा आजचे राशीभविष्य
खनिजमिश्रण देणं गरजेचे का?
चांगल्या आरोग्यासाठी आणि शरीराच्या चांगल्या वाढीसाठी जनावरांच्या आहारात ऊर्जा आणि प्रथिनांशिवाय खनिज द्रव्यांचे व जीवनसत्त्वाचे पुरेसे प्रमाण असणे गरजेचे असते.
जनावरांच्या आहारामध्ये सामान्य क्रिया घडवण्यासाठी कर्बोदके, प्रथिने व क्षार जास्त प्रमाणात तर जीवनसत्त्वे व खनिजे कमी प्रमाणात लागतात. जनावरांच्या आहारामध्ये एकूण २२ खनिजांची आवश्यकता असते.
ज्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, गंधक, सोडिअम, पोटॅशिअम आणि क्लोरिन ही सात प्रमुख खनिजे आहेत. तसेच आपण पाहिले तर सूक्ष्म खनिजांमध्ये मुख्यतः लोह, जस्त, मॅंगेनीज, तांबे, आयोडीन, कोबाल्ट आणि सेलेनिअम अशा १५ सूक्ष्म खनिजांचा समावेश होतो.
ई-पीक पाहणीच्या नवीन अॅपवरुन वेळीच प्रक्रिया करा; अन्यथा होईल मोठे नुकसान
खनिज कमतरतेमुळे उत्पादनात घट होते
1) दुधाळ जनावरांना खनिजांची गरज पूर्ण न झाल्यास दूध उत्पादनावर परिणाम होतो.
2) प्रजनन क्षमतेवर देखील परिणाम होतात आणि जनावरांची चयापचय क्रिया व्यवस्थित होत नाही.
3) दूध उत्पादनात कमतरता दिसून येते.
4) जनावर माजावर येत नाहीत.
5) गर्भाशयामध्ये दोष निर्माण होण्यास सुरवात होते.
6) दुधाळ जनावरांचा भाकड काळ वाढतो आणि त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो.
महत्वाच्या बातम्या
Goat Rearing: शेळी पालनातून शेतकरी होतील करोडपती; फक्त अशी करा शेळयांची निवड
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेसंदर्भात अडचणी येत आहेत? करा फक्त एकच काम..
शेतकऱ्यांनो आता आपला शेतमाल दुसऱ्या राज्यातही विका! वाहतुकीसाठी मिळणार 3 लाखांचे अनुदान
Share your comments