Lumpy Skin: देशात २ वर्षांपूर्वी कोरोना महामारीने थैमान घातले होते. यामध्ये लाखो लोकांचे जीव गेले. मात्र माणसाबरोबर जनावरांनाही (Animal) साथीचा रोग (Epidemic disease) आला आहे. यामध्ये जनावरे मरण्याची संख्या वाढत आहे. लम्पी रोगाने देशातील पशुपालकांची (Cattle breeder) चिंता वाढवली आहे.
राज्यातील शेतकरी चारही बाजूने संकटात सापडला आहे. कोरोना काळात शेतमाल पडून राहिला तर आता कांद्यासारख्या पिकाला बाजारभाव भेटत नाही. त्यातच मुसळधार पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळत असतो. मात्र आता पशुपालनावरही रोगाचे संकट घोंगावत आहे. त्याचा परिणाम दुधावर होत आहे.
कांद्याचा वांदा! बाजारात भाव मिळेना आणि निसर्गाला बघवेना, शेतकरी मेटाकुटीला...
लम्पी (Lumpy) आजाराने देशात धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत देशात 57 हजार जनावरांचा मृत्यू (Death of animals) झाला आहे तर महाराष्ट्रात २५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लम्पी आजाराचा महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे.
लम्पी रोगाचा प्रादुभाव वाढू नये यासाठी उपाययोजना राबवण्याला वेग आला आहे. जास्तीत जास्त लसीकरणावर भर दिला जात आहे. पशुसंवर्धन विभागाने जनावरांचे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. याअगोदर कोरोनामुळे जनावरांचे आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले होते.
जळगाव जिल्ह्यात लम्पी रोगाने सर्वाधिक थैमान घातले आहे. पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. तर लसीकरण आणि उपाययोजना एवढाच पर्याय असल्याने शेतकऱ्यांनी त्याची अंमलबजावणी करावी असा सल्ला विखे-पाटील यांनी दिला आहे.
Gold Price: सोने खरेदीसाठी करू नका उशीर! सोने 5300 रुपयांनी स्वस्त...
सातारा जिल्ह्यातील 1 हजार 435 जनावरांना या रोगाने ग्रासलेले आहे. तर राज्यात 25 जनावरांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे आठवडी बाजाराबरोबरच जनावरांची वाहतूक, जत्रेच्या ठिकाणी जनावरे विक्रीसाठी आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच ज्या जनावरांना लम्पी रोगाचा प्रादुभाव झाला आहे त्या जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवण्यासही सांगण्यात आले आहे. तसेच गोठा आणि जनावरांच्या स्वच्छतेची काळजी घेण्यास सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Dairy Farming: शेतकरी दरमहिन्याला कमावणार लाखोंचा नफा; अनुदानावर चालू करा डेअरी फार्म
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठी भेट! DA सह पगारही वाढणार
Share your comments